आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडेखोरांनी महावितरणचे एटीपी मशिन फोडले; 5 लाख केले लंपास; सुरक्षारक्षकालाही मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महातवितरणच्या मुख्य कार्यालयातील सुरक्षा रक्षकावर हल्ला करुन दरोडेखोरांनी एटीपी मशीन (ऑल टाईम पेमेंट) फोडून 5 लाख 60 हजार 240 रुपये लांबवले. ही घटना काल (गुरुवारी) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी पहाटे तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

दुर्गा चौकातील  महावितरणच्या कार्यालयात सुरक्षारक्षक सतीश उर्फ सुधीर मधुकर लाळे हे ड्युटीवर होते. चार ते पाच जण कार्यालयातील भिंत ओलांडून आत आले. दरोडेखोरांच्या टोळीतील एकाने लाळे यांना पिण्यासाठी पाणी मागितले आणि दुसरे दरवाजा आत ढकलत आत शिरले. दरोडेखोरांनी लाळे यांच्यावर चाकूने हल्ला करीत त्यांना जखमी केले. त्यानंतर  चोरट्यांनी बाजूलाच असलेली एटीपी मशिन फोडून त्यातील 5 लाख 60 हजार 240 रुपये पळवले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली.

 

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...