Home | Maharashtra | Vidarva | Akola | Round to Maratha MP-MLA's house

मराठा अामदार-खासदारांच्या घराला घेराव; क्रांतिदिनी करणार जनअांदाेलन

प्रतिनिधी | Update - Aug 01, 2018, 12:46 PM IST

मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी १ ते ९ अाॅगस्ट दरम्यान जनअांदाेलन छेडण्याचा निर्धार मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाज

 • Round to Maratha MP-MLA's house

  अकोला- मराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी १ ते ९ अाॅगस्ट दरम्यान जनअांदाेलन छेडण्याचा निर्धार मंगळवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात अाला. याच दरम्यान जिल्ह्यातील मराठा अामदार-खासदारांच्या घरांना घेराव घालण्याचा निर्णयही घेण्यात अाला. बैठक जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे पार पडली.


  जिल्हा सकल मराठा समाजातर्फे २३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर ठिय्या अांदाेलन केले हाेते. मराठा समाजाला अारक्षण लागू झाल्यानंतरच शासनाने नाेकर भरती करावी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत न देणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळाकडे दाखल कर्ज प्रकरणं मंजूर करावीत, स्वामी नाथन अायाेग लागू करावा यासह इतरही मागण्यांसाठी अांदाेलन केले. त्यानंतर २५ जुलैला जिल्हाबंदची हाक दिली हाेती. बंद हा कडकडीतच हाेता. जनअांदाेलनाच्या पृष्ठभूमीवर घेतलेल्या बैठकीला उपस्थित मराठा समाज बांधवांनी अापली मतं व्यक्त केली. शेतीसह इतरही मुद्द्यांवर काहींनी मतप्रदर्शन केले. न्याय्य हक्कांसाठी एकत्र येणे अावश्यक असून, काेणीही न घाबरता जनअांदाेलनात सहभागी हाेण्याचे अावाहन करण्यात अाले. अांदाेलन जनसामन्यांपर्यंत पाेहाेचण्यासाठी प्रत्येक अायुधाचा वापर करावा, असेही काही युवक म्हणाले. मराठा खासदार, अामदारांना मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्यांनी विविध सभागृहांत काेणते प्रयत्न केले, यंत्रणांकडे कसा पाठपुरावा, याचा जाब जनअांदाेलनादरम्यान विचारणार अाहे. अांदाेलन ठिकाणी 'मराठा अारक्षणासंदर्भात मराठा खासदार, अामदार, मंत्री यांनी अांदाेलनात सहभागी हाेऊ नये,'असा फलकच लावला हाेता.


  जि. प. कर्मचारी भवनात मंगळवारी ेमराठा अारक्षणासह इतरही मागण्यांसाठी १ ते ९ अाॅगस्ट दरम्यान जनअांदाेलनाचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकित केला. मराठा अामदार-खासदारांच्या घरांना घेराव घालण्याचा निर्णयही घेतला.


  जिल्हा परिषद कर्मचारी भवनात दरराेज होणार बैठक
  ९ अाॅगस्टपर्यंत हाेणाऱ्या जनअांदाेलनाबाबत नियोजन व अंमलबजावणी बाबत राेज िजल्हा परिषद कर्मचारी भवन येथे बैठक हाेणार अाहे. या बैठकीत वेळाेवेळी घडणाऱ्या घडामोडी, मागण्या, जनअांदाेलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार अाहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Trending