आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- कर्ज माफीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. नाफेड मार्फत तूर खरेदीचे १५ ते २० हजार शेतकऱ्यांचे थकीत १२६ कोटी रुपये पेरणीपूर्वी देण्यात यावे, बोगस खते व बियाण्यांची तपासणी क्वॉलिटी कंट्रोलर मार्फत करण्यात यावी, खतांचे वाढवलेले दर कमी करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी आज २९ मे रोजी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाभरात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. तर बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 


जिल्ह्यातील लोणार, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा या पाच तालुक्यातील शिवसंग्रामच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. तर बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये खरीप हंगाम हा आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु अद्यापही ७४५ कोटी ६१ लाख पीककर्ज वाटपासाठी बँकांना टार्गेट असताना आतापर्यंत दोन टक्क्याच्या आतच पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करून तुरीचे चुकारे देण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड , तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, शहराध्यक्ष सुजित तोवडे, गणेश भोसले, सुभाष टेकाळे, श्रीकृष्ण जेऊघाले, नंदु राऊत, पवन देशमुख, योगेश गायकवाड, नामदेव रिंढे, सुनील सोनुने, ज्ञानेश्वर सुरपाटने, अनिल काटोले, संदीप तायडे, राजेश पुरभे, गौतम खरात, आशिष आव्हाड, अशोक दुप्पड, राजु गायकवाड, किशोर सुरोशे, सतिष रिंढे, नीलेश इंगळे, अमरदिप देशमुख, मंगेश राजपूत, चेतन मुळे, अमोल देशपांडे, राजकुमार चौधरी, नंदु चव्हाण, सुनील चव्हाण, प्रमोद गुरुडे,राजु कावळे, सुनील पाटील यांच्यासह असंख्य शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. 


देऊळगावराजा शहरामध्ये शिवसंग्रामचा रास्ता राेको 
शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे चुकारे तत्काळ देण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी येथील बसस्थानक चौकात आज २९ मे रोजी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान स्थानिक पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. राज्यात शासनाने शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेड अंतर्गत हमी भावाने खरेदी केली आहे. तूर खरेदी करून तीन ते चार माहीने झाले आहे. परंतु तालुक्यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यां पैकी फक्त ७० ते ८० शेतकऱ्यांनाच तुरीचे चुकारे देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची हेळसांड थांबविण्यासाठी तुरीचे चुकारे द्यावे, कर्ज माफी योजनेचा लाभ देण्यात यावा, खताचे वाढलेले दर कमी करून खरीप हंगाम पेरणी पूर्वी कृषी केंद्रातील बोगस खत-बियाण्याची तपासणी करावी, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. या शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जहीर खान पठाण, शंकर शिंदे, अनिस खान, युसूफ शाह, गोविंद टेके, निखिल पांडे, हारून शहा, नासेर मिर्झा, सोनू मिश्रा, मदन डुरे, शे.इब्राहिम यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...