आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळी विराेधात गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यास सज्ज व्हा; व्यवस्थापन चळवळीचा प्रारंभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक शेतकरी यंदा उद््ध्वस्त झाला असून बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठे, कृषी विभागाने समन्वय ठेवणे गरजेचे आहे. या चळवळीचा आरंभ अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून झाला असून येणाऱ्या काळामध्ये अळीचा नि:पात करण्यासाठी गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या वतीने ‘बी. टी. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन’ कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेचे उद््घाटक म्हणून फुंडकर बोलत होते. 


शेतकऱ्यांपर्यंत ही चळवळ दोन तीन महिन्यात न्यायची आहे. कापूस उत्पादक २० जिल्ह्यांमध्ये बोंडअळी विरोधी अभियान राबवणार आहोत. कापूस पिकाची पेरणी जून, जुलैमध्ये करुन उंगलवाडी डिसेंबर, जानेवारीमध्ये झाल्यास अळीची समस्या राहणार नाही, याकडेही फुंडकर यांनी लक्ष वेधले. बोंडअळीचा प्रादुर्भाव विदर्भामध्ये झाल्यानंतर कृषी विद्यापीठाने केलेल्या उपाययोजनांची माहिती कुलगुरु डॉ. भाले यांनी प्रास्ताविकात दिली. 


विदर्भ, मराठवाड्यातील बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरुलू म्हणाले. गुजरात पॅटर्नमध्ये योजलेल्या उपायाबाबत सीडी त्यांनी कृषिमंत्री फुंडकर यांना भेट दिली.


डॉ. राम खर्चे म्हणाले, राज्याच्या ४१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १६ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे. तेवढेच मराठवाड्यात आहे. यामध्ये अळीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास व्हावा. पीक पद्धतीत बदल करताना पर्याय देता येईल का, याचाही विचार व्हावा.

 

काय आहे गुजरात पॅटर्न
आणंद कृषी विद्यापीठाच्या किटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. के. बोराड यांनी गुजरात पॅटर्नचे सादरीकरण केले. गुजरात, महाराष्ट्रात रस्त्याच्या बाजूला लावलेल्या पराट्यांमुळे बोंडअळीचे पोषण झाले. पूर्व हंगामी पेरणी, अप्रमाणित बियाण्यांचा वापर, डोळ्यांनी न दिसणाऱ्या अळ्या यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचवली. शेतकरी तसेच जीन मालकांनी फेरोमेन ट्रॅप, ५ टक्केच्यावर नुकसान पातळी दिसल्यास फवारणी करावी. श्रेडरचा वापर, शेतातील पिकांची लवकर काढणी हे उपयुक्त ठरु शकतात.

बातम्या आणखी आहेत...