आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्ययावत माहिती नसल्याने चर्चा पुढे ढकलली; अनु. जाती कल्याण समिती उद्या घेणार आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - भरती, पदाेन्नतीबाबतची माहिती अद्ययावत नसल्याचे सांगत विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषदेमधील चर्चा बुधवारी पुढे ढकलली. अाता ही समिती शुक्रवारी अाढावा घेणार अाहे. समितीमध्ये सहा अामदारांसह अधिकाऱ्यांचा समावेश हाेता.

 

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या दाैऱ्याला १० जानेवारी राेजी प्रारंभ झाला. समितीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी समितीचे जि.प.मध्ये अागमन झाले. समितीने अधिकाऱ्यांशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात चर्चा केली. यामध्ये समितीचे अध्यक्ष अामदार हरिष पिंपळे, वाशिमचे अामदार लखन मलीक, उमरगाचे अामदार ज्ञानराज चौगुले, नागपूरचे अामदार प्रकाश गजभिये प्रा. अामदार जोगेंद्र कवाडे, पिंपरीचे अामदार गाैतम चाबुकस्वार यांचा समावेश हाेता. चर्चेच्या वेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास खिल्लारे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे, समाज कल्याण अधिकारी जवादे, मुख्य लेखा वित्त अधिकारी साेनी यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते.

 

चालक पदाेन्नतीवर झाली चर्चा ? : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनुसूचित जाती कल्याण समितीने चालक पदाेन्नतीवर चर्चा केली. पाच पदे भरण्यात अाली नसल्याचे पुढे अाले. यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले. ही पदे वर्ग चारमधून पदाेन्नतीने भरण्यात येतात. या पदासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनाच पदाेन्नती देण्यात येते. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असणे, ताे पदाेन्नतीच्या वेळी शारिरीकदृष्टया पूर्णपणे सक्षम असणे अावणश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. अधिकाऱ्यांच्या उत्तरानंतर समितीने बिंदुनामावलीबाबत माहिती सादर करण्यास सांगितले. मात्र माहिती अद्ययावत नसल्याचे म्हणत समितीने चर्चा पुढे ढलकण्यात येत असल्याचा निर्णय दिला. दाैऱ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी ठरलेल्या कार्यक्रमानुसार माहिती संकलित केली हाेती. त्यानुसार प्रश्नावली (बुकलेट) तयार करण्यात अाली हाेती. मात्र वेगळेच प्रश्न पुढे अाल्याचे समजते. याबाबत नेमका तपशील मिळू शकला नाही.

 

काय म्हणतात अध्यक्ष ?
अनुसूचितजाती कल्याण समितीचे अध्यक्ष अामदार हरिष पिंपळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती अद्यायावत नसल्याने चर्चा शुक्रवारी हाेणार असल्याचे सांगितले. तपशीलवार माहिती सांगण्यास नकार दिला.

 

पुन्हा करावी लागणार तयारी : अनुसूचित जाती कल्याण समितीच्या दाैऱ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने सभागृह सभागृहाबाहेर तयारी केली हाेती. अाता समिती १२ जानेवारी राेजी पुन्हा जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करणार अाहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना पुन्हा तयारी करावी लागणार अाहे.

 

लाभाच्या याेजनेत बदल करण्याची मागणी :स्थानिक स्वराज्य संस्थेतील लाभाच्या याेजनेअंतर्गत थेट लाभाची रक्कम लाभार्थी खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याबाबत बुधवारी अनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षांना भारिप-बमंसचे सदस्य गाेपाल काेल्हे यांनी निवेदन दिले. लाभार्थ्याने धनादेश, डिडी किंवा अारटीजीएसने दुकानदाराच्या खात्यात साहित्य खरेदीपूर्वी जमा करणे अावश्यक अाहे. त्यानंतर देयक साहित्याबाबत ग्रामसेवकाचे छायाचित्र जमा करावे लागते. हे अतिशय किचकट निकष पूर्ण करणे मागासवर्गीय गरीब लाभार्थ्यांना शक्य नसल्याने ते लाभापासून वंचित राहत असल्याचे काेल्हे यांचे म्हणणे अाहे. त्यामुळे हे निकष रद्द करुन जीएसटीची पावती अाणून साहित्य दाखवल्यावर त्याच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हावी, अशी व्यवस्था करण्याची मागणी काेल्हे यांनी केली.

 


अधिकाऱ्यांची झाली बैठक
अनुसूचितजाती कल्याण समितीने चर्चा पुढे ढकलल्यानंतर जिल्हा परिषद सभागृहात वरिष्ठ अधिकारी विभाग प्रमुखांची बैठक झाली. अधिकाऱ्यांमध्ये नेमकी काेणती माहिती नव्हती, यावर चर्चा केली. अाता गुरुवारी राहिलेली माहिती किंवा यापूर्वीच संकलित केलेली माहिती नव्याने वेगळ्या पद्धतीने तयार करुन मांडण्यात येणार असल्याचे समजते.

 

अाज करणार प्रत्यक्ष पाहणी
अनु. जाती कल्याण समिती गुरुवारी शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करणार अाहे. तसेच समिती जिल्हा परिषद यंत्रणेकडून करण्यात अालेल्या याेजनांच्या कामांना भेटी देणार अाहे. या दाैऱ्यात समिती संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही करणार अाहे. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा कचेरीतील सर्व विभाग प्रमुखांशी त्रृट्यांबाबत चर्चा करणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...