आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळी प्रकरणी बियाणे कंपन्यांवर फौजदारी कारवाईचा मार्ग माेकळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- कापूस बीटी बियाणे वाणावर गुलाबी अळीने हल्ला केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याप्रकरणी बुधवारी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून (एसएअाे) जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ६ कंपन्यांवर कारवाई हाेण्यासाठी अहवाल दिले. यामध्ये दाेन यंत्रणांचा अहवाल, बियाण्यांचे देयके, शेतकऱ्यांची मूळ तक्रार, सातबारा अादींना समावेश अाहे. याबाबत दै. दिव्य मराठीने सातत्याने पाठपुरावा केला हाेता.    


२६ डिसेंबर राेजी कृषी विभागाकडून  जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी   पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत बियाणे कंपन्यांनी महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९चे उल्लंघन झाल्याचे म्हटले अाहे. बाेंड अळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. त्यामुळे याबाबत कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,असेही तक्रारीत नमूद केले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सहा कंपन्यांची नावं नमूद केली अाहेत. 

 

या आहेत कंपन्या
यामध्ये कावेरी सिड्स प्रा. िल. (हैदराबाद), आदित्य सिड्स (सिकंदराबाद), राशी सिड्स (मेडक- तेलंगणा), रॅलीज इंडिया लि. (इंडिया), अजित सिड्स प्रा. िल. (अाैरंगाबाद), बायर क्राॅम सायन्स (ठाणे) या उत्पादक कंपन्यांचा समावेश अाहे. या सहा कंपन्यांची बियाणे तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरले हाेते.

बातम्या आणखी आहेत...