आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याला मृत्यू झालेल्या अकोल्यातील तीन युवकांवर आज अंत्यसंस्कार, दोघे अद्याप बेपत्ता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गोवा येथील समुद्रात बुडालेल्या तीन युवकांचे मृतदेह मंगळवारी दुपारी शवविच्छेदनानंतर अकोल्याकडे तीन अॅम्ब्युलन्समधून रवाना करण्यात झाले. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ते अकोल्यात पोहोचणार आहेत. त्यानंतर उमरी परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तीन युवकांचा मृत्यू झाल्याने उमरी परिसर निश:ब्द झाला आहे. 


उमरी येथील प्रीतेश लंकेश्वर नंदागवळी, चेतन लंकेश्वर नंदागवळी, उज्ज्वल वाकोडे, किरण मस्के, शुभम वैद्य, मिलिंद मुळतकर, अनिकेत पुरुषोत्तम कहाळे, बंटी काकडे, विक्की काकडे, अनिकेत पांडे व श्रीजय वनारे असे ११ युवक गोवा फिरण्यासाठी गेले होते. सोमवारी गोव्यातील कलंगुट बीचवर यापैकी ८ जण पोहण्यासाठी उतरले होते. या आठही जणांना उसळलेल्या लाटेने कवेत घेतले. त्यापैकी पाच जण बुडाले तर तिघे काठावर फेकले गेले. त्यानंतर २० मिनिटांनी प्रीतेश लंकेश्वर नंदागवळी, चेतन लंकेश्वर नंदागवळी व उज्ज्वल वाकोडे यांचे मृतदेह काठावर फेकले गेले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत किरण मस्के व शुभम वैद्य यांचा शोध सुरु होता. मंगळवारी सकाळी तिघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन गोवा येथील मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आल्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांचे पार्थिव अॅम्ब्युलन्समधून अकोल्यासाठी रवाना करण्यात आले होते. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अकोल्यात पोहोचतील असा अंदाज वर्तवला जात आहे. 


दोन मृतदेह सापडले; मात्र ते दुसरेच निघाले 
मंगळवारी दिवसभर मृतदेह शोधमोहीम राबवण्यात आली. १२ वाजताच्या सुमारास दोन मृतदेह शोधण्यात जवानांना यश आले होते. मात्र ते मृतदेह दुसरेच निघाले. त्यामुळे पुन्हा शोधमोहीम सुरु केली होती. 


अनिकेत, विक्की अन् राहूल पार्थिवासोबत 
लाटेते बाहेर फेकलेला अनिकेत म्हणाला, 'शुभम, किरणचा शोध लागेल या आशेवर होतो. मात्र त्यात यश आले नाही. मी, राहूल बोरकर, विक्की काकडे सोबत तीन रुग्णवाहिकांमधून येत आहोत. तर इतर मित्र खासगी बसने गावाकडे येत आहेत' 


जिल्हा प्रशासन गोवा प्रशासनाच्या संपर्कात 
गोव्यातील समुद्रात बुडालेल्या तीन युवकांचे मृतदेह बुधवारी १३ जूनला दुपारपर्यंत अकोल्यात पोहोचणार आहेत. जिल्हा प्रशासन गोवा प्रशासनाच्या संपर्कात आहे. अन्य दोन युवकांचा मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शोध लागलेला नव्हता. मृतकांच्या नातेवाइकांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन पाठपुरावा करणार आहे.
- श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन गोवा 

बातम्या आणखी आहेत...