आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा; एलसीबीकडून दोघांविरोधात गुन्हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट- आयपीएलच्या सामन्यांवर खायवाडी करणाऱ्या दोघांविरुद्ध एलसीबीने कारवाई केली. यापूर्वी शहर पोलिसांनीसुद्धा गवळीपुरा भागातील दोघांच्या विरोधात क्रिकेट सट्टा बुकिंग करताना कारवाई केली होती. 


टाकपुरा भागातील रहिवासी अर्पण मधुकर गुजराथी व योगेश देवीचंद सोनी हे आयपीएलच्या मॅचवर सट्टा खायवाडी करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली. त्यानुसार केलेल्या कारवाईत अर्पण गुजराथीच्या घरी टाकपूरा येथे छापा टाकला असता त्यांना तिथे मॅचवर सट्टा खायवाडी करत असल्याचे आढळले. त्यांच्या जवळून २ जुने मोबाइल किंमत ४५ हजार, २ लॅपटॉप किंमत अंदाजे ४८ हजार रुपये, एलजी कंपनीचा एलईडी किंमत २५ हजार रुपये, २ रिमोट किंमत ४०० रुपये, मोबाइल चार्जर किंमत १०० रुपये, सेट ऑफ बॉक्स किंमत १५०० रुपये, कॅल्क्युलेटर किंमत २०० रुपये व नगदी ३३ हजार रुपये असा एकूण १ लाख ५३ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला. खायवाडी करणारे कारमधून फिरून व्यवसाय करतात असे दिसून आले आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, पो. निरीक्षक कैलास नागरे, पो. उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, हेकॉ प्रमोद डोईफोडे, पो. कॉ. शंकर डाबेराव, संदीप काटकर, मंगेश मदनकार, निलेश चाटे यानी केली. 


अवैध धंद्यांवर सर्वत्र कारवाई सुरू राहणार 
आयपीएल सामन्यावर जो सट्टेबाज खायवाडी करणार त्यांची माहिती द्यावी. सांगणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. अकोटमध्ये आमचे विशेष लक्ष असून, अवैध धंद्यावर कारवाई सुरूच राहील. 
- कैलास नागरे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...