आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई दर्शनासाठी जाणारे खामगावचे 2 युवक ठार; मनमाड- मालेगाव मार्गावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- येथून शिर्डीला दर्शनासाठी जात असलेल्या शहरातील युवकांच्या कारचे टायर फुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोन जण जखमी झाले. ही घटना मनमाड-मालेगाव महामार्गावरील कुंदलगाव शिवारात २ फेब्रुवारी राेजी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. 


हर्षल खानचंदाणी, वय २१ वर्षे, रा. झुनझुनवाला प्लॉट, विशाल लेखवाणी रा. सिंधी कॉलनी, लखन पेशवाणी व सनी पेशवाणी सर्व रा. खामगाव हे चौघे मारेाती सुझुकी कार क्रमांक एम. एच. २८/ एएन/ ४७५१ ने शिर्डी येथे जाण्यासाठी १ मार्च रोजी रात्री निघाले होते. शिर्डी जात असताना मार्गातील मनमाड-मालेगाव मार्गावरील चांदवड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंदलगाव नजीक कारचे मागील टायर फुटल्यामुळे कार चालक हर्षल खानचंदाणी याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली. यात चालक हर्षल खानचंदाणी व त्याचा बाजुला बसलेला विशाल लेखवाणी हे दोघे जण ठार झाले. तर मागील सिटवर बसलेले लखन व सनी पेशवाणी हे जखमी झाले. या जखमींना तातडीने उपचारासाठी मनमाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. मृतक हर्षल याचे एसमॅन रेडीमेड कापडचे दुकान आहे. तर विशाल हा सिंहगड येथे इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिकत होता. या दोघांचे मृतदेह २ मार्च राेजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास खामगाव येथे आणण्यात आले आणि त्यांच्यावर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. 

बातम्या आणखी आहेत...