आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे 25वे आयुक्त वाघ आज रुजू होणार; दीड महिन्यानंतर मनपाचे कामकाज होणार सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दीड महिन्यापासून रिक्त असलेल्या मनपा आयुक्तपदी जितेंद्र वाघ अखेर मंगळवारी २६ डिसेंबरला रुजू होत आहे. त्यामुळे मनपाचेे कामकाज सुरळीत होणार आहे. नवे आयुक्त मनपाच्या कामकाजाची घडी कशी बसवतात? याबाबत कर्मचारी, नागरिकांना उत्सुकता आहे. 


अजय लहानेंची १० नोव्हेंबरला यवतमाळ येथे बदली झाली. तर त्यांच्या जागी मुंबई महानगर विकास प्राधिकरण येथे कार्यरत जितेंद्र वाघ यांची आयुक्त म्हणून एक वर्षासाठी नियुक्ती केली. १३ नोव्हेंबरला अजय लहानेंनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार दिला. नवे आयुक्त जितेंद्र वाघ केव्हा रुजू होणार? याबाबत तर्कवितर्क लढवले. परंतु ते मंगळवारी रुजू होणार असल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. रुजू झाल्यानंतर विस्कटलेली मनपाची काम काजाची गाडी रुळावर येईल. भाजप मधील अंतर्गत वाद, मनपाची आर्थिक परिस्थितीवर मात करून जितेंद्र वाघ मनपाचा गाडा कसा हाकतात? याबाबत आता उत्सुकता आहे. 


पुढील स्लाइडवर वाचा, यापूर्वीचे मनपा आयुक्त आणि त्यांचा कालावधी...

बातम्या आणखी आहेत...