आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या विरोधात जनाक्रोश मोर्चा; संयुक्त राष्ट्र संघ, पंतप्रधानांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारंजा (लाड)- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरूसलेमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावा विरोधात शुक्रवारी २२ डिसेंबर रोजी जमीयत उलेमा हिंद कारंजा शाखेच्या वतीने तहसीलदार यांना मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 


या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार इस्लाम धर्मात जेरुसलेम स्थित मस्जिदे अक्साला अतिशय श्रद्धेचे स्थान आहे. पैगंबर हजरत मोहंमद सल्लला अलैवसल्लम यांनी या मस्जीद मध्ये सर्व अबिंयाची ईमामत केली. यामुळे या धर्म स्थळाला संपूर्ण विश्वातील मुस्लिम समाजात असाधारण महत्त्व आहे. परंतू नुकतेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जेरूस्लेमला इस्राईल देशाची राजधानी घोषित करण्याचा एकतर्फी निर्णय केला. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. 


आॅल इंडिया जमियत उलेमा हिंद नवी दिल्ली च्या निर्देशानुसार स्थानिक जमियत उलेमा हिन्दचे अध्यक्ष मौलवी ईमदादुल्ला खान, जामा मस्जिदचे इमाम खतीब मौलवी अब्दुल रशीद माजीदी करंजवी यांच्या नेतृत्व शहरातील मौलवींनी तथा शेकडो मुस्लिम बांधवांनी तहसीलदाराचा मार्फत संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.या वेळी निवेदन देताना मुफ्ती मोहसीन खान, मुफ्ती इलियास खान, कासमी, मुफ्ती इलियास खेतीवाले, मौलवी मजहर मजाहीरी, मुफ्ती अयाज कासमी, हाफीस मोहसीन कुरेशी, मौलवी आरिफ, हाफीज शहजाद, हाफीज मुसद्दीक, हाफीज मुदस्सीर, मुफ्ती उमर, मौलवी फिरोज, मौलवी अब्दुल रहेमान, प्रा. ए.एस.शेख, भारिप जिल्हाध्यक्ष मो.युसूफ पुजांनी, नगर सेवक गटनेता फिरोज शेकुवाले, नगर सेवक सलीम गारवे, जाकीर शेख, जाकीर अली, निसार खान, डाॅ. अजमल, डाॅ एजाज खान, डाॅ मकदुम अली, डाॅ अ.मतीन, डाॅ रागेब खान, डाॅ अब्दुल रज्जाक, शकील मिर्झा, डाॅ. मुज्जमिल खान, सलीम तेली, एजाज खान, अन्नु पहिलवान,ताज पप्पूवाले, सलीम प्यारेवाले, रशीद निन्सूरवाले आदी मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती,अशी माहिती जमीयत उलेमा हिंद कारंजा शाखेच्या वतीने कळवण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...