आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या बुलडाण्यामध्ये 12वे जिल्हा साहित्य संमेलन; नाटकाचे राहणार विशेष आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणा यांच्या पुढाकाराने १२ वे बुलडाणा जिल्हा साहित्य संमेलन गर्दे वाचनालयाच्या ताराबाई शिंदे साहित्य नगरीत साहित्यिक-संशोधिका प्रा.डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. 


२४ फेब्रुवारीला सकाळी ९ वा. ताराबाई शिंदे यांच्या वाड्यावरून अशी संमेलनाची जागर दिंडी निघणार आहे. या जागर दिंडीमध्ये ज्ञानदीप विद्यालयाचे विद्यार्थी वेशभूषेसह सहभागी होणार आहेत. सकाळी १०.३० वाजता पत्रकार-लेखक-संपादक संजय आवटे संमेलनाचे उद्््घाटन करणार असून याप्रसंगी पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ. गणेश गायकवाड, आमदार हर्षवर्धन सपकाळ, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी-लेखक श्रीकांत देशमुख, डॉ. सदानंद देशमुख, डॉ. केशव देशमुख, डॉ.एस.एम.कानडजे, अजीम नवाज राही, प्रा. सुनील देशमुख आदींच्या उपस्थितीत उद््घाटन सोहळा रंगणार आहे. दुपारच्या सत्रात आम्ही नवोदित काय वाचतो? काय लिहितो? या विषयावरच्या टॉक शो मध्ये सचिन कापसे हे संवादक असून देऊळगावराजाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा टॉक शो होणार आहे. 

 

या नवोदित कवी-लेखक सत्यपालसिंग राजपूत, प्रेषित सिद्धभट्टी, सौ.पुजा खरात-वानेरे, सौ. वैशाली तायडे, संजय खरात, मंजितसिंग शीख, सौ.मनिषा थुट्टे-राऊत, दीपाली सुसर सहभागी होणार आहेत. समकालीन राजकीय परिस्थिती आणि साहित्यिकांची भूमिका हा टॉक-शो शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कादंबरीकार-कवी रमेश इंगळे उत्रादकर, शिवाजी जवरे, रवींद्र इंगळे-चावरेकर, नारायणराव जाधव येळगावकर, दिनकर दाभाडे, किरण डोंगरदिवे प्रामुख्याने सहभागी होणार आहेत. 


कवी प्रा.डॉ.गोविंद गायकी यांच्या अध्यक्षतेखाली कवीकट्टयाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व नामवंत कवी या कवीकट्ट्यामध्ये निमंत्रित करण्यात आले आहे. समारोपीय सत्रात प्रमुख अतिथी म्हणून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील पत्रांचे लेखक अरविंद जगताप, दैनिक दिव्य मराठीचे कार्यकारी संपादक सचिन काटे, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, रवी टाले, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार विजयराज शिंदे, निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, राजेंद्र काळे, सुधीर चेके-पाटील प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. समारोपीय सत्रात बुलडाणा जिल्ह्यातील ज्या लेखक-कवी-कलावंतांनी साहित्य-कला-संस्कृतीच्या क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे अशा ज्येष्ठ निवडक मान्यवरांचा याप्रसंगी मानपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. 


संमेलनाच्या शेवटी युथ फोर्स मल्टिपर्पज सोसा. बुलडाणा यांच्या वतीने अमोल कुळकर्णी लिखित व ॲड. गणेश देशमुख दिग्दर्शित यथा राजा या दोन अंकी नाटकाचा विशेष प्रयोग गर्दे सभागृहात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गर्दे वाचनालयाच्या परिसरात काही ग्रंथप्रदर्शन व विक्रीचे आयोजनही करण्यात आले आहे. जिल्हाभरातून साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या प्रतिनिधींनी संमेलनस्थळी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना सहभागाचे प्रमाणपत्र आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे. 


जिल्ह्यातील लोक कलावंतांनी तसेच साहित्य रसिकांनी या जिल्हा साहित्य संमेलनास उपस्थित राहावे असे आवाहन संमेलन स्वागताध्यक्ष प्रा.डॉ.अनंत सिरसाट, संमेलन संयोजक नरेंद्र लांजेवार, संमेलन सचिव सुभाष किन्होळकर, संमेलन कोषाध्यक्ष रणजितसिंग राजपूत, संमेलन निमंत्रक सचिन कापसे यांच्यासह विदर्भ साहित्य संघ शाखा बुलडाणा व संमेलन स्वागत समितीने केले आहे. 


यांचा होणार गौरव 
यावेळी प्रामुख्याने प्रा.ई.जी.धांडे, शंकर कऱ्हाडे, गो.या.सावजी, श्रीमती लिलाताई जोशी, श्रीमती गोदावरी पाटील, ना.जा.दांडगे, सुदाम खरे, प्रा.बी.ए.खरात, अरविंद देशपांडे, ॲड.विजयकुमार कस्तुरे, श्रीमती सुमनताई फडके, भाऊ भिसे, भगवान जाधव, चिंतामण जाधव, शाहीर बी.आर.इंगळे, ज.ह.खरात, प्रा.गुलाबराव खेडेकर, उत्तमराव खरात, डॉ. भिवसन दाभाडे, वासुदेव देशपांडे, उत्तमराव बिडवे, बापूसाहेब मोरे, शालिग्राम सोनुने, मधुकर ढवळे, निवृत्ती घोंगटे, यशवंत बोरीकर, वा.का.दाभाडे अादींना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...