आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरचे रागावल्याने 13 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या, अकोल्‍यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेल्हारा- तालुक्यातील आकोली रूपराव येथील एका १३ वर्षीय मुलाने घरचे रागावले म्हणून आत्महत्या केल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली. घरचे रागावले म्हणून तालुक्यातील आकोली रुपराव येथील श्रीकृष्ण ढोकणे यांच्या १३ वर्षीय ओम या मुलाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. तो तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. बुधवारी संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन असल्याने सोमवारी मुंडगाव येथे पायदळ जाण्याचा हट्ट धरला होता. सकाळी शाळेत जाण्याकरिता घरच्यांनी म्हटलं असता. तो गेला नाही म्हणून घरचे त्याच्यावर रागावले. याचाच राग धरून त्याने घराच्या बाजूला असलेल्या गायवाड्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ओम हा घरात सर्वात लहान होता. त्यामुळे घरच्यांना फार मोठा धक्का बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...