आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेतील महत्त्वाची 14 पदे अद्यापही रिक्तच, अधिकाऱ्यांवर कामाचा ताण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना तसेच अकोलेकरांनी भाजपकडे एकहाती सत्ता सोपवल्या नंतर देखील महापालिकेतील उपायुक्तांसह अत्यंत महत्त्वाची १४ पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांमुळे ठराविक अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे तर दुसरीकडे कामास विलंब होत आहे. 


महापालिकेत मागील साडेसात वर्षापासून भाजपची सत्ता आहे. तर चार वर्षापासून राज्यात भाजप सत्तेवर आहे. अकोला शहरातून दोन आमदार भाजपचे निवडून आले असून नगरविकास राज्यमंत्रीपदही अकोल्यालाच मिळाले आहे. महापालिका निवडणुकीत अकोलेकरांनी ८० पैकी ४८ नगरसेवक भाजपचे निवडून दिले. मात्र सत्ता हस्तगत केल्या नंतर भाजपला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. मागील चार वर्षात अतिरिक्त आयुक्त वगळता इतर महत्त्वाची पदे रिक्तच आहेत. या सर्व प्रकारामुळे कामास विलंब होत असून नागरिक वेठीस धरले जात आहे. 


विशेष म्हणजे, महापालिकेत उपायुक्तांची दोन पदे मंजूर असताना उपायुक्तांचे एक पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे. तर आता पाच महिन्यापासून दोन्ही पदे रिक्त आहेत. महापालिकेने झोन कार्यालये सुरू केली. तेथून विविध विभागाचे कामकाज सुरू आहे. मात्र साहाय्यक आयुक्तांची पदे रिक्त असल्याने झोन कार्यालयातील कारभार ढेपाळले आहे. कामकाजाला होणारा विलंब लक्षात घेता, आतापर्यंत आलेल्या सर्वच आयुक्तांनी ही रिक्तपदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात यावी, यासाठी सतत पाठपुरावा केला. मात्र शासनाने दखल घेतली नाही. 


महत्त्वाची रिक्त पदे अशी 
उपायुक्त- ०२ 
साहाय्यक आयुक्त - ०४ 
उपसंचालक नगररचना - ०१ 
स. संचालक नगररचना - ०१ 
मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी  - ०१ 
मुख्य लेखा परीक्षक - ०१ 
मुख्य अग्निशमन अधिकारी - ०१ 
उप अभियंता - ०१ 
आरोग्य अधिकारी - ०१ 
सहा.मूल्य निर्धारण अधिकारी - ०१ 
नगररचनाकार - ०१ 
लेखाधिकारी - ०१ 


मे महिन्यात रिक्त पदे भरल्या जातील 
एप्रिलच्या शेवटी बदल्या होणार आहेत. या अनुषंगाने महापालिकेतील रिक्त पदे भरण्याबाबत पावले उचलण्यात आली आहेत. नगररचना विभागातील रिक्तपदे भरल्या जातील. सोबतच मेमध्ये इतरही पदे भरले जातील. 
- डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री 

बातम्या आणखी आहेत...