आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट तालुक्यात दोघांची गळफास लावून आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - तालुक्यात दोघांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना सुकळी आणि कुटासा येथे मंगळवारी, जानेवारीला उघडकीस आल्या.

 

आत्महत्येची पहिली घटना अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत अकोट ते बोर्डी रस्त्यावरील सुकळी येथे घडली. सुकळी येथील विजय संपत गुरळकर वय ४१ वर्षे यांनी मंगळवारी जानेवारीला पहाटेच्या सुमारास घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीची पत्नी गेल्या काही दिवसांपासून माहेरी गेलेली असून,ते घरी एकटेच होते.

 

मंगळवारी अकोट ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून, ठाणेदार मिलिंद बहाकार यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण ठाण्याचे पोलिस पुढील तपास करीत आहे.


दुसरी आत्महत्येची घटना दहिहांडा पोलिस ठाण्याअंतर्गत कुटासा येथे घडली. कुटासा येथील शेवकराम राजाराम डाेंगरे वय ६० वर्ष धंदा शेती रा.कुटासा यांनी मंगळवारी जानेवारीला घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत व्यक्तीची पत्नी बाहेरगावी गेलेली हाेती त्यामुळे ते घरी एकटेच हाेते.

 

मंगळवारी दहिहांडा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पाठवला असून, ठाणेदार गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनात पाेलिस हेडकॉन्स्टेबल दयाराम राठाेड पुढील तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...