आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलकापूरच्या खेळाडूंनी घेतली सुवर्ण झेप; पटकावले 4 सुवर्ण आणि एक कांस्य पदक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन, विदर्भ पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व माजी उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित राष्ट्रीय ज्युनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा तिरपुडे कॉलेज नागपूर येथे शुक्रवार १९ ते मंगळवार २३ जानेवारी दरम्यान झाल्या. या स्पर्धेत मलकापूरच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण तर १ कांस्य पदक पटकावले. 

 

नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय ज्युनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत २८ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यात मलकापूरचे ८ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत ४३ किलो वजन गटात दिव्या विनोद खत्री हिने दोन सुवर्ण पदके पटकावणारी व राज्यातील पहिली ज्युनियर महिला खेळाडूचा पुरस्कार तिने आपल्या नावे केला. ८४ किलो वजन गटातून काजल नरेंद्र ठाकूरने सुवर्ण पदक, समृद्धी राजेंद्र झंवरने सुवर्ण पदक व पुरुष गटातून १२० किलो मधून अजय शिंगणेने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंमध्ये आशिष ढोले, आकाश नायसे, ईश्वर तारापूरे, वृषभ क्षीरसागर होते. स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून राम मेहेसरे, अक्षय पाटील यांनी काम पाहिले. विजयी खेळाडूंचे डॉ. श्रीकांत वरणकर, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष किशोर नवले, सूर्यकांत उंबरकार, राहुल देशमुख, गणेश तायडे, संदीप वैष्णव, प्रा. नितीन भुजबळ यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


खेळाडूंनी इच्छाशक्तीच्या बळावर मिळवला विजय 
क्रीडा क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी खेळाडूंना परिश्रम, मेहनत घ्यावी लागते. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी अथक परिश्रम व इच्छाशक्तीच्या बळावर खेळाडूंनी सुवर्ण, कांस्य पदक मिळवत विजय मिळवला आहे सूर्यकांत उंबरकार, सचिव, पॉवरलिफ्टिंग संघटना 

बातम्या आणखी आहेत...