आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल गाण्याला मिळाल्या 5 लाख लाइक्स; पीआय शेळके खाकी वर्दीतील सिक्रेट सुपरस्टार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पोलिस दलातील लोक आपल्या कडक आणि दमदार आवाजासाठी ओळखले जातात. मात्र, अकोला पोलिस दलातील अधिकारी गजानन शेळके हे सध्या आपल्या मधुर आवाजामुळे प्रसिद्ध होत आहेत. अकोटमध्ये भूमी फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात आग्रहाखातर शेळके यांनी किशोर कुमारांच्या आवाजातील "चलते चलते मेरे ऐ गीत याद रखना' हे गाणे गायिले. त्यांचे हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् तीन दिवसांत तब्बल पाच लाखांच्या जवळपास नागरिकांनी त्यांच्या गाण्याला दाद दिली आहे. 


गजानन शेळके हे सध्या संवेदनशील अकोट पोलिस ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना सततचा बंदोबस्त आणि व्यस्तता यातून त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे. कॉलेज जीवनापासून त्यांना गाण्याचा छंद आहे. मात्र जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते आपल्या आवाजाला वाट मोकळी करून देतात. 'चलते-चलते मेरे ये गीत याद रखना..हे गाणे गावून त्यांनी वेगळा ठसा उमटवला. अकोला पोलिस दलात सध्या त्यांच्या गायनाचे कौतूक होत आहे. भूमी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व ठाणेदार शेळके यांच्या मित्रांनी गाणे व्हायरल केले. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर पसरली. त्यांचं गाणं खूप आवडल म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी चक्क दूर दूरून अभिनंदनाचे फोन येत आहेत. 


दरम्यान, भूमी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आग्रहाखातर गायिलेले गाणे नंतर मित्रांनी व्हायरल केल्याचे नंतर पीआय शेळकेंना समजले. 

बातम्या आणखी आहेत...