आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवताे भाडाेत्री व्यक्ती; दोषींवर बीडीओ करणार कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- पारस येथील उर्दू शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी भाडाेत्री व्यक्तिची नेमणूक केल्याचा गाैप्यस्फाेट भाजप सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला. यावर गटविकास अधिकऱ्यांनी (बिडीअाे) मी स्वत: चाैकशी केली असून, यात एक शिक्षक दाेषी अाढळल्याचे सांगितले. मात्र, जिल्हा परिषदेत सादर केलेला अहवालच दाबल्याचे बिडीअाेंनी सांगताच सभागृहात उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. अखेर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सामान्य प्रशासन) अहवालाची प्रत सादर करा; कारवाई करण्यात येईल, असे सभागृहात सांगितले. सभेत यंदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे वितरण याेजनेला मंजुरी दिली. 


स्थायी समितीच्या सभेत भाजपचे ज्येष्ठ सदस्य रामदास लांडे यांनी पारस येथील उर्दू शाळेत ४ ते ५ शिक्षकांनी ३/४ हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काही व्यक्तिंची नेमणूक केल्याचा मुद्दा मांडला. ६०-७० हजार रुपये वेतन घेणाऱ्या शिक्षकांनी शिकवण्यासाठी खासगी व्यक्तिंची नेमणूक केल्याप्रकरणी स्थानिकांनी तक्रारी केल्या. पंचायत समितीस्तरावर चाैकशीही झाली. मात्र, ना कारवाई झाली, ना हे प्रकार बंद झाले. याकडे बिडीअाे, बीईअाे, केंद्रप्रमुखांचे लक्ष नाही काय, सवाल त्यांनी केला. यावर अध्यक्षा संध्या वाघाेडे यांनी बाळापूर बिडीअाे शिंदे यांना उत्तर देण्यास सांगितले. याबाबत पंचायत समितीचे संबंधित अधिकारी चाैकशी अहवाल सादर करत नसून, मी स्वत: एका प्रकरणाची चाैकशी केली. यात एक शिक्षक दाेषी अाढळला. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. मात्र, ताे अहवाल दडपला; अाणखी किती वेळा चाैकशी करायची, असा सवालही बिडीअाेंनीच केला. संबंधित शिक्षकांचे वेतन कसे काढले, असा प्रश्न अध्यक्षा वाघाेडे यांनी उपस्थित केला. याप्रकरणी इतर सदस्य गाेपाल काेल्हे, हिम्मतराव घाेटाेळ, गजानन उंबरकर, शाेभा शेळके यांनीही कारवाईची मागणी केली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) विकास खिल्लारे यांनी अहवालाची प्रत सादर करा; अामच्या विभागाकडूनच कारवाईची प्रक्रिया करताे, असे सांगितले. सभेला उपाध्यक्ष जमीर उल्ला खान पठाण, कृषि सभापती माधुरी गावंडे, महिला व बाल कल्याण सभापती देवकाबाई पाताेंड, समाज कल्याण सभापती रेखा अंभाेरे, सदस्य दामाेदर जगताप यांच्यासह अधिकारी उपस्थित हाेते. 


दलितवस्तीच्या निधीवरून धरले धारेवर: १) दलित वस्तीचा निधी हस्तांतरण करण्यावरून सदस्या शाेभा शेळके यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पंचायत समितीने ग्रामपंतायतींना ५० टक्के हस्तांतरित करणे अावश्यक असते, असे समाजकल्याण अधिकारी जवादे म्हणाले. यावर शेळके यांनी तेल्हारा बिडीअाेंना किती ग्रामपंचायतींना किती टक्के निधी हस्तांतरित केला, असा प्रश्न विचारला. त्यावर बिडीअाेंनी २५ टक्के हस्तांतरित केला असून, कामानुसार निधी दिल्याचे सांगितले. बिडीअाेंनी साेमवारी निधी हस्तांतरित करण्यात येईल, असे सांगितले. समाज कल्याण व महिला -बालकल्याण विभागासारखी राबवलेली वैयक्तिक लाभाची याेजना कृषी विभागासाठी का राबवली नाही, असा सवाल सदस्य घाटाेळ यांनी केला. यावर जवादे यांनी शासन निर्णयात संबंधित विभागाला कार्यपद्धती निश्चित करण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले. २) वैयक्तिक लाभाच्या याेजनांच्या लाभार्थ्यांना अार्थिक वर्ष संपण्याच्या १/२ दिवस पूर्वीच सांगितल्याने त्यांची तारांबळ उडाली, अनेक जण वंचित राहिले, असे सदस्य घाटाेळ व सदस्य शेळके म्हणाल्या. ३) विषय शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या असून, अनेक शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याचे सदस्य काेल्हे म्हणाले. त्यामुळे तूर्तास जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात न येण्याचा ठराव घ्या, असेही ते म्हणाले. त्यावर उपशिक्षणाधिकारी कांगटे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार अद्याप साेपवला नसून, प्रभार अाल्यानंतरच सांगता येईल, असे त्या म्हणाल्या. 


 
अनुपालन अहवाल मिळेना 
अनुपालन अहवाल मिळत नसल्याचा मुद्दा ज्येष्ठ सदस्या शाेभा शेळेक यांनी मांडला. अधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना पत्र दिल्याचे सांगितले. शिक्षण, पंचायत विभागाने अहवाल अाणल्याचे सांगितले. डिएचअाेही अहवाल अाणल्याचे म्हणाले. यावर अध्यक्षांनी सदस्यांना प्रत द्या, असे म्हणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अनुपालनाची माहितीच मिळत नसल्याचे सभागृहात का यायचे, असा सवाल शेळके यांनी उपस्थित केला. 


शाैचालयाची हाेणार चाैकशी 
भाजपचे ज्येष्ठ सदस्य रामदास लांडे यांनी अापल्या सर्कलमध्ये शाैचालय बांधकामात अनियमितता झाल्याचा मुद्दा मांडला. शाैचालय बांधकासासाठी लाभार्थ्यांना ३ ते ४ हजार रुपये खर्च अाला असून, लाभार्थींकडून कर्मचाऱ्यांनी अाधीच बँक विड्रालवर स्वाक्षरी घेतली. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, याप्रकरणी चाैकशी करा, अशी मागणी त्यांनी केली. यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यु. टी. मानकर यांनी एका महिन्यात चाैकशी करू, असे सांगितले. मात्र, सदस्यांनी अहवाल लवकर द्या, अशी मागणी केली. हे प्रकार अनेक ठिकाणी सुरु असल्याचेही सदस्य म्हणाले. त्यावर १५ दिवसांत अहवाल सादर करताे, असे मानकर यांनी सांगितले. 


...तरीही बियाणे वितरण याेजनेवर चर्चा 
अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे वितरण याेजनेला कृषी समितीच्या सभेत मंजुरी दिली. याेजना ४० लाखांची असल्याने मंजुरीसाठी प्रस्ताव शनिवारी स्थायी समितीच्या सभेत मांडला. मात्र, स्थायी समितीच्या सभेत किती शेत जमिन असलेल्या शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करावे, किती रुपयांचे वाटप करण्यात येईल, यावर चर्चा केली. त्यामुळे कृषी समितीत अथवा प्रस्ताव तयार करण्यापूर्वी काेणता निर्णय घेतला हाेता, असा सवाल या चर्चेच्या निमित्ताने उपस्थित केला. अखेर प्रत्येक लाभार्थ्याला जास्तीत जास्त हजार रुपयांपर्यंतचे बियाणे देण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांकडून ८ अ, ७/१२ घेण्यात येणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...