आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनोखा विक्रम! मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनिटात केली आधार नोंदणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- खामगाव येथील अग्रवाल कुटुंबीयांनी मुलीच्या जन्मनंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणी करून अनोखा विक्र केला आहे. याआधी सहा वर्षांपूर्वी उस्मनाबाद संतोष जाधव या व्यक्तीने आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर सहा मिनीटात आधार कार्ड काढण्याचा विक्रम होता. हा विक्रम आता मोडीत निघाला आहे. अग्रवाल कुटुंबात जन्मलेल्या या चिमुकलीचे नाव साची ठेवण्यात आले आहे.

 

खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी शिल्पा यांना प्रसुतीसाठी जलंब येथील रोडवरील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 18 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून सात मिनिटानी शिल्पा अग्रवाल यांनी एका चिमुकलीला जन्म दिला. यानंतर अवघ्या 1 मिनीट 48 सेकंदात आकाश अग्रवाल यांनी आपल्या मुलीची आधार नोंदणीचा विक्रम केला. यापूर्वीचा विक्रम उस्मानाबाद येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर आहे. संतोष जाधव यांनी आपली मुलगी भावना संतोष जाधव हिच्या जन्मानंतर अवघ्या सहा मिनीटात तिची आधार नोंदणी केली होती. त्यानंतर आता खामगाव येथील आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या जन्मानंतर अवघ्या 1 मिनीट 48 सेकंदात काढून विक्रम नोंदविला आहे.

बातम्या आणखी आहेत...