आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांच्या दाव्यानुसार महेशचा पीएम फेलाे ते माअाेवादी कार्यकर्ता प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महेश सीताराम राऊत हा ३० वर्षीय तरुण मूळचा चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील माेर्शी गावचा रहिवासी. सध्या ताे नागपूरमध्ये धनगवडी येथे रहात हाेता. नक्षलग्रस्त भागात पीएमअारडी अंतर्गत ग्रामविकास याेजनांसाठी फेलाेशिप मिळाल्यानंतर गडचिराेली जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास अहेरी भागातील काही गावे दत्तक दिली हाेती. त्या ठिकाणी त्याने काम करणे अपेक्षित असताना ताे गडचिराेलीतील एटापल्ली तालुक्यात सूरजगड येथील प्रस्तावित लाेहखनिजविराेधी अांदाेलनात सक्रिय हाेऊन त्याने प्रकल्पांविराेधात अाघाडी निर्माण केली. 


मुंबईतून अटक करण्यात अालेले रिपब्लिकन पँथरचे नेते सुधीर ढवळे यांची सहकारी हर्षालीसाेबत महेश पाेलिसांना गडचिराेलीच्या जंगलात काॅइनवर्षी या 
गावात संशयितरित्या फिरताना सुरुवातीला मिळून अाले. 


नक्षलवाद्यांची वरिष्ठ नेता नर्मदा अाक्का हिला भेटण्यासाठी दाेघे फिरत असल्याचा पाेलिसांना संशय अाला. त्यानुसार त्यांच्याकडे सखाेल चाैकशी केली असता त्यांनी पीएमअारडीचे फेलाे असलेले अायकार्ड दाखवत वेळ मारून नेली. त्यानंतर सहा महिने फेलाेशिप अंतर्गत काम करून नंतर ते साेडून देत महेश ‘भारत जनअांदाेलन’शी जाेडला गेला. 


मागील एक वर्षापासून ‘झारखंड विस्थापनविराेधी जनविकास अांदाेलन’ या मंचासाेबत ताे काम करू लागला हाेता. मात्र, फेब्रुवारी २०१८ मध्ये झारखंड सरकारने संबंधित मंच ही नक्षल समर्थक संघटना असल्याने तिच्यावर बंदी घातली. दरम्यानच्या काळात, महेश हा झारखंड येथील नक्षलवादी दामाेदर तुरी याच्या संघटनेशी जाेडला जाऊन त्या माध्यमातून त्याने काम सुरू केले.

 

चांगल्या कामासाेबत वाईट काम
महेशचे प्रतिबंधित माअाेवादी संघटनेसाेबत संबंध असल्याचे तपासादरम्यान निदर्शनास अाले. यावरून त्याच्यासह इतरांवर बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) अधिनियम कलमानुसार ही कारवाई करण्यात अाली. पीएमअारडीचा फेलाे म्हणून गडचिराेलीत काम करत असताना त्याने सध्या मुंबईतील नक्षल समर्थक सुधीर ढवळेसाेबत कार्यरत असलेली कार्यकर्ती हर्षाली पाेतदार हिच्यासाेबत काम केले अाहे. गडचिराेली, चंद्रपूर, नागपूर भागात वेगवेगळ्या संघटनांशी जाेडून त्याने सुरुवातीला खाणकामविराेधी, पेसा कायदा प्रचाराचे काही ठिकाणी चांगले काम केले.

 

मात्र, त्यासाेबतच नक्षलवाद्यांशी संबंध अाल्यानंतर त्याने वाईट कामांना साथ दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात अाली अाहे. एल्गार परिषदेच्या अायाेजनात दिल्लीचा राेना विल्सन व महेशनी सहाय्य केल्याचे दस्तावेज अाम्हाला मिळालेले अाहेत.

-रवींद्र कदम, सहपाेलिस अायुक्त,पुणे

 

नक्षलवादांचे पैसे राऊतने शहरात पाेहाेचवले
गडचिराेली जिल्ह्यात महेश काम करीत असताना त्याने पेसा कायद्याबाबत काम केले हाेते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी तेथील एका ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभेत त्याला पाच लाख रुपये दिले. त्यानंतर हे पैसे शहरी भागात असलेल्या नक्षल समर्थकांपर्यंत पाेहाेचविण्यात अाले अाहे. पाेलिसांनी महेशच्या नागपूर येथील घराची सहा जून राेजी अचानक झडती घेतली असून त्यात जप्त करण्यात अालेल्या इलेक्ट्रिक डिव्हाइसमधील डाटा शासकीय लॅबकडे देऊन सखाेल तपास करणे गरजेचे अाहे.
- अॅड. उज्ज्वला पवार - जिल्हा सरकारी वकील, पुणे न्यायालय

 

यूएपीए कलम लावणे बेकायदेशीर
महेश हा एल्गार परिषदेस हजर नव्हता तसेच काेरेगाव- भीमा दंगलीवेळी ताे कोलकात्यात हाेता. याबाबतची विमान तिकिटे त्याने पाेलिसांकडे दिलेली असल्याने या घटनेशी त्याचा काेणताही संबंध नाही. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक (यूएपीए) हे कलम देशाच्या सार्वभाैमत्वाशी निगडित असून देशविराेधी कारवार्इ करणाऱ्यांवर ते लावले जाते. दंगल दाेन समाजात तेढ निर्माण झाल्याने घडलेली घटना अाहे. त्यानंतर पाच महिन्यांनी राऊतला अटक करण्यात अाली असून, त्याचे एफअायअारमध्ये नाव नसताना ही त्याच्यावर यूएपीए हे गंभीर कलम लावण्यात अाले अाहे. याप्रकरणी भीमा-काेरेगावसंदर्भात गुन्हा दाखल असलेले मनाेहर भिडे अाणि मिलिंद एकबाेटे यांच्याविराेधातही यूएपीए कलम पाेलिसांनी लावणे गरजेचे अाहे.
- अॅड. शाहिद अख्तर - महेशचे वकील

बातम्या आणखी आहेत...