आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा सहायक आयुक्त विजय हुमणेंसह तीन जणांवर कारवाई; वाहन साहित्य खरेदी घोटाळा भोवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- महापालिकेच्या कारखाना विभागातील अधिकाऱ्यांनी वाहनांचे टायर, बॅटरीसह सुटे भाग बाजारातील दराच्या तुलनेत दोन ते पाचपट अधिक रकमेने खरेदी केले. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी हा प्रकार चव्हाट्यावर आणला. शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय गाजला. या घोटाळाप्रकरणी विभागाचे प्रमुख तथा सहायक आयुक्त विजय हुमणे, तत्कालीन विभागप्रमुख उज्ज्वल लांजेवार, तांत्रिक अभियंता राजेश गुरनुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश कार्यकारी महापौरांनी दिले. 


शुक्रवारी महाल येथील नगर भवनात महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत सहारे यांना विषय लावून धरला. कारखाना विभागाने बाजारात मिळणारे टायर दुपट दराने खरेदी केले. बॅटरी, डिझेल फिल्टर आदी सुटे भागाच्या खरेदीसाठीही बाजारभावाच्या तुलनेत आठपट दर दिल्याचा आरोप त्यांनी केला. यावर विभागप्रमुख सहायक आयुक्त विजय हुमणे यांनी दर पत्रकानुसार साहित्य खरेदी केल्याचे सांगितले. तर सहारे यांनी दरपत्रक कुठल्या आधारे तयार केले? दुकानातून दर घेतले की घरी बसून दरपत्रक तयार केले? अशी प्रश्‍नांची सरबत्ती केली. 


विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, प्रफुल्ल गुडधे, सतीश होले, आभा पांडे यांनीही कारखाना विभागाच्या बेदरकार कारभारावर ताशेरे ओढले. कारखाना विभागात वाहनांची दुरुस्ती होत नसून सर्व वाहने बाहेर दुरुस्तीसाठी पाठवून कमिशन खाण्याचे काम केले जात असल्याचा आरोप होले यांनी केला. सदस्यांच्या तीव्र भावना आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विभागप्रमुख सहायक आयुक्त विजय हुमणे, तत्कालीन विभागप्रमुख उज्ज्वल लांजेवार, तांत्रिक अभियंता राजेश गुरनुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. तसेच पंधरा दिवसांत चौकशी करून अहवाल पुढील सभेत ठेवण्यास सांगितले. 


बाजारभावाच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट किमतीने साहित्याची खरेदी केली. टाटा कंपनीची गाडी इएक्स-२५१५ चे एमआरएफ कंपनीचे टायर ३५,९५० रुपये दराने खरेदी केले. परंतु खुल्या बाजारात याच टायरची किंमत १४ हजार ८०० रुपये आहे. एमआरएफचा रिडायल टायर ८५ हजार ४५६ रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. बाजारात याच टायरची किंमत १८ हजार ४०० रुपये आहे. टाटा सुमोसाठी लागणारी बॅटरी (१२ होल्ट) १८ हजार ५०० रुपये दराने खरेदी केली आहे. बाजारात याच बॅटरीची किंमत हजार ३९० रुपये आहे. डिझेल फिल्टरची प्रत्येकी १५ हजार ७८४ रुपयाला खरेदी करण्यात आली. बाजारात किंमत ५५० रुपये आहे. हजार ५०० रुपयांचा खिडकीचा काच ११ हजार २७४ रुपयाला खरेदी केला. एक्सव्हेटरसाठी लागणाऱ्या व्हाल्वची किंमत १० हजार असताना तो ६९ हजार ६८३ रुपयांना खरेदी करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...