आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावणेनऊ कोटींच्या कामांना १५ महिन्यांनंतर होतोय प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महापालिकेतील नगरसेवकांना मंजूर झालेल्या निधीतून तब्बल १५ महिन्यानंतर विकास कामांना प्रारंभ करता आला. महापालिकेला एप्रिल २०१७ मध्ये नगरोत्थान आणि दलितेतर वस्ती विकास निधी असे दोन्ही मिळून पावणे नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. 


महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. मार्च महिन्यात भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. तर एप्रिल महिन्यात महापालिकेला नगरोत्थान आणि दलितेतर वस्ती विकास निधी मंजूर झाला. या निधीतून सर्वच नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामे घेण्यात आली. सत्ताधारी गटाने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना अधिक निधी दिला तर शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना तुलनेने कमी निधी दिला. 


यावरून विरोधकांनी भाजपवर टीकाही केली. मात्र या टिकेला न जुमानता भाजप आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यानंतर नगरसेवकांनी या निधीतून आपापल्या प्रभागातील मिळालेल्या रकमेत बसतील तेवढी कामे सुचवली. मात्र विविध कारणांमुळे या कामांना प्रारंभ होवू शकला नाही. सत्ता स्थापन करून एक वर्ष लोटूनही प्रभागात कोणतीच विकास कामे न झाल्याने नगरसेवकही वैतागले होते. एवढेच नव्हे तर सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी आंदोलन, मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. कारण या वर्षभरात नगरसेवकांना मागील पावसाळ्यात दोन-चार ट्रक मुरूम मिळाला होता. त्यामुळे नागरिकांचीही दूषणे नगरसेवकांना खावी लागत होती. मात्र सत्तेचे एक वर्ष लोटल्या नंतर आता या निधीतील कामांना प्रारंभ होत आहे. या दोन्ही निधीतील कामांचे आदेश बांधकाम विभागाकडून देणे सुरू आहेत. त्यामुळे तब्बल १५ महिन्या नंतर या विकास कामांना प्रारंभ होत आहे.

 
या कारणांमुळे झाला विलंब 
नगरोत्थान योजनेत ३० टक्के निधी महापालिकेला टाकावा लागतो. मागील वर्षी नगरोत्थान योजने अंतर्गत तीन कोटी ७५ लाख रुपयाचा निधी मिळाला. यात महापालिकेला निधी लवकर टाकता आला नाही. तर दुसरीकडे प्रथम नगरसेवकांनी या निधीतून पथदिवे सुचवले होते. पुढे शासनाच्या जीआर नुसार या निधीतून पथदिव्यांचे काम घेता येत नसल्याने पथदिव्यांचे काम रद्द करून दुसरे काम सुचवावे लागले. तर तिसरे म्हणजे प्रस्ताव तयार करण्यासाठी अभियंत्यांची कमतरता, या सर्व प्रकारामुळे या निधीतील विकास कामांना प्रारंभ होण्यास विलंब झाला. 


रस्ते, नाल्या आदी कामांचा समावेश 
या निधीत रस्त्याचे डांबरीकरण, क्राँक्रीटीकरण, कर्ल्व्हट, नालीचे बांधकाम आदी लहान-सहान कामे घेण्यात आली आहे. ही कामे सर्वच प्रभागात केली जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...