आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात-बारा संगणकीकरणात अकोला जिल्हा राज्यात दुसरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सात-बारा या दस्तऐवजाचे निर्दोषपणे संगणकीकरण करण्यात अकोला जिल्हा प्रशासनाने राज्यात आघाडी घेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल शासनाने जिल्हा प्रशासनाला प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे. 


चावडी वाचन करुन अचूक संगणकीकृत सात-बारा व खाते उतारे तयार करण्याची विशेष मोहीम शासनाने अलीकडेच हाती घेतली होती. त्याअंतर्गत घोषणापत्र तीन पूर्ण करुन अकोला जिल्हयाने राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल शासनाने हा पुरस्कार बहाल केला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेखचे संचालक एस. चोकलिंगम यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र मिळाल्याबददल जिल्हा प्रशासनाचे कौतुक होत आहे. डीजिटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत राज्यातील अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण आणि ऑनलाईन सात-बारा हा उपक्रम सर्व जिल्हास्तरावर सुरु आहे. 


याशिवाय महत्त्वाच्या जुन्या भूमि अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे काम संपूर्ण राज्यात सुरु आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने केलेल्या सदर उत्कृष्ट कार्याबददल शासनाच्या महसूल विभागातर्फे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हयातील सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी, डीबीए, तलाठी यांना प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...