आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: आज एकाचवेळी 15 आमदार येणार शहरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विधिमंडळाच्या अनुसूचीत जाती कल्याण समितीच्या दौऱ्यानिमित्त उद्या, बुधवारी एकाचवेळी १५ आमदार शहरात दाखल होणार आहेत. अनुसूचीत जातीला (एससी) दिल्या जाणाऱ्या सोई-सवलतींच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनात काय चित्र आहे, याची वास्तविकता ही समिती जाणून घेणार आहे.


मुर्तीजापुरचे आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या या समितीमध्ये भाजपचे सहा, शिवसेनेचे तीन, काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर युनायटेड जनता दल आणि पिरिपाच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. हे सर्व आमदार महोदय आज, मंगळवारी रात्रीपासूनच शहरात दाखल होत आहेत.

 

बुधवारी सकाळी ही समिती लोकप्रतिनिधींशी चर्चा करेल. त्यानंतर १० वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात प्रशासकीय बैठकांची श्रृंखला सुरु होईल. सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालय त्यानंतर पोलिस विभागाशी चर्चा केली जाईल. सकाळी ११.३० वाजता समाजकल्याण कार्यालय, १२.३० वाजता महावितरण तर दीड ते अडीच वाजताच्या दरम्यान मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. दुपारच्या जेवणानंतर दुपारी साडे तीन ते सायंकाळी साडे पाच या वेळात जिल्हा परिषद आणि साडे पाच ते साडे सहा या वेळात कृषी विद्यापीठाचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काही शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.

 

शेवटच्या दिवशी सकाळी ११ वाजता त्रुट्या दूर करण्यासाठी पुन्हा यंत्रणांसोबत बैठक होईल. ही बैठकही जिल्हाधिकारी कार्यालयात होईल.


समितीमध्ये या आदारांचा आहे समावेश: आमदारांमध्ये पिंपळे यांच्याशिवाय वाशिमचे लखन मलीक, आर्णीचे राजू तोडसाम, केज येथील प्रा. संगिता ठोंबरे, उमरगाचे ज्ञानराज चौगुले, अंबरनाथचे डॉ. बालाजी किन्हीकर, पिंपरीचे गौतम वाघुळवार, साक्रीचे धनाजी अहिरे, चंदगडच्या संध्यादेवी कुपेकर, धारावीच्या प्रा. वर्षा गायकवाड, मुंबईचे भाई विजय गिरकर, नागपूरचे प्रकाश गजभिये प्रा. जोगेंद्र कवाडे, गोरेगावचे कपील पाटील यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...