आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सतरा वर्षाचे आहात ना? नोंदवा मतदारांसाठी नाव; निवडणूक आयोगाची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मतदार बनण्यासाठीच्या वयाची अट अठरा वर्षे असली तरी १७ व्या वर्षीच आता नाव नोंदवले जात आहे. निवडणूक आयोगाने या वर्षीपासून हा वेगळा उपक्रम हाती घेतला असून आगामी १५ डिसेंबरपर्यंत त्यावर अंमल केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने आखलेल्या आतापर्यंतच्या उपक्रमात इतिहास निर्माण करेल असा हा उपक्रम आहे. 


मतदार यादीचे पुनरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग दरवर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात विशेष अभियान राबवत असते. आगामी वर्षाच्या जानेवारी महिन्याला आधार मानून जे व्यक्ती वयाची अट पूर्ण करतात, त्यांना नव्याने मतदार होण्याची संधी या दरम्यान दिली जाते. 


परंतु यावर्षी वय वर्षे सतरा असणाऱ्यांचीही नावे नोंदवून घेतली जात आहेत. यासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रनिहाय नियुक्त बीएलओंना (ब्लॉक लेव्हल ऑफिसर) गृहभेटीचा कार्यक्रम आखून दिला असून दररोज सकाळी सायंकाळी प्रत्येक घरी जाऊन तेथील सदस्यांची माहिती नोंदवून घेतली जात आहे. त्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मतदार आहेत, त्यांच्या नाव-पत्यातील बदलाची नोंद घेणे, जानेवारी २०१८ मध्ये जे वयाची १८ वर्षे पूर्ण करतात, त्यांना नवमतदार म्हणून नोंदवून घेणे आणि जे पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये वयाची अट पूर्ण करतील, त्यांची वेगळी नोंद घेणे, अशी कामे बीएलओमार्फत केली जात आहेत. 


अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर हे पाचही विधानसभा मतदारसंघ मिळून १५८५ मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बीएलओंची संख्याही तेवढीच आहे. पूर्वी ही संख्या १४४६ होती. त्यात १३९ केंद्रांची वाढ झाल्यामुळे नवी संख्या १५८५ वर पोचली आहे. या केंद्रांवरील बीएलओंना सकाळ-संध्याकाळी गृहभेटींचा कार्यक्रम आखून दिला असून त्यांच्या माध्यमातून नवमतदार पुढच्या वर्षीसाठीचे प्रस्तावित मतदार असा दोन्ही प्रकारचा डाटा गोळा केला जात आहे. 


योग्य प्रकारे सुरु आहे मतदारांची नोंदणी 
मतदान केंद्रनिहाय नियुक्त बीएलओंच्या माध्यमातून मतदारांची नोंदणी योग्यप्रकारे सुरु आहे. नवमतदार आणि प्रस्तावित मतदार यांची संख्या १५ डिसेंबरनंतर स्पष्ट होईल. 
- राजेशखवले, उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, अकोला. 

बातम्या आणखी आहेत...