आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या मोबाईलवर आला अज्ञात व्यक्तीचा मिसकॉल, पतिने घेतला संशय आणि घडले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- पत्नीला मिसकॉल आला. त्याची तक्रारही पत्नीने पोलिसात केली. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचे भूत शिरल्याने त्याने पत्नीसोबत वाद घातला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने पत्नीवर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. त्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी पतीविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. 


खदान येथील अर्जून देवचंद पठ्ठे यांची बहीण लक्ष्मीचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील विनोद बन्सी खिरे यांच्यासोबत झाला होता. मात्र गेल्या सात- आठ महिन्यापासून लक्ष्मी ह्या त्यांच्या माहेरी मुलांसह राहत आहेत. शुक्रवारी त्यांचा पती विनोद खिरे हा आला. 


दरम्यान, लक्ष्मी यांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीचा मिसकॉल आला. कुणाचा फोन आला म्हणून विनोद याने पत्नीसोबत वाद घातला. त्यानंतर लक्ष्मी यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रारही दिली. त्यानंतर विनोद शांत झाला. मात्र, रात्री पुन्हा मिसकॉलवरून विनोदने लक्ष्मी यांच्यासोबत वाद घातला. या वेळी त्याने लक्ष्मी यांच्या डोक्यावर आणि पाठीवर हातोड्याने मारून जखमी केले. या प्रकरणी रात्री उशिरा लक्ष्मी यांचा भाऊ अर्जुन पठ्ठे यांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पतीविरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शनिवारी दुपारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...