आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळ चोरणारे खेकडे, चतुर उंदीर, अस्वलाच्या भाकरी अन् धोक्याची सूचना देणारे झाड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- अरण्य हा अलिखित ग्रंथ संशोधक वृत्तीने सतत वाचणारे मारुती चितमपल्ली यांच्याकडे या अद््भुत विश्वातील अनेक अनोखी निरीक्षणे आहेत. नारळ चोरणारे खेकडे, उंदरांचे चातुर्य, अस्वलाच्या भाकरी, प्राण्यांतील संमोहनशास्त्र, वैशिष्ट्यपूर्ण पक्षी, प्राणी, कीटक आणि वृक्ष असे एक ना अनेक. चितमपल्ली यांच्याशी झालेल्या गप्पांत त्यांनी असे अनेक किस्से सांगितले.  


अरण्यात निरीक्षण करताना काय काळजी घेतली पाहिजे, यावर चितमपल्ली म्हणाले, ज्या अरण्यात जायचे आहे तेथील वाटा, नदी-नाले यांची माहिती नकाशाच्या रूपात जवळ ठेवावी. जंगलात वाट चुकू नये यासाठी झाडांच्या बुंध्यांवर खुणा करत पुढे जावे. वाट चुकली तर नदी किंवा ओढ्याच्या काठाकाठाने जावे म्हणजे एखादे गाव लागते. 


सूचना देणारे झाड

गुंजाचे झाड भूकंप, ज्वालामुखी तसेच हवामानातील बदलाची सूचना देते. असे काही होणार असेल तर गुंजांची पाने लाजाळूच्या पानांप्रमाणे मिटतात. सोने वजन करण्यासाठी पूर्वी गुंजा वापरत. एका तोळ्यात ९६ गुंजा भरतात. प्रत्येक गुंजाचा आकार-वजन एकसारखेच असते. 

 

अस्वलाच्या मधाच्या भाकरी
जंगलातून फिरत असताना अनेकदा गुहांमध्ये भाकरीसारखे पदार्थ आढळतात. या अस्वलाच्या भाकरी. मधाच्या हंगामात अस्वले टेंबरं, माेहाची फुले, जांभूळ, रायमुनिया आदी फळे खाऊन त्यावर मधाचे पोळे खातात. गुहेत परतल्यावर अर्धवट पचलेली फळे व मधाचे मिश्रण ते खडकावर ओकतात. ते सुकले की त्यापासून जाड भाकरी तयार होते. मधामुळे या भाकरीतील त्यातील फळे सडत नाहीत. जेव्हा जंगलात अन्नाचे दुर्भिक्ष असते तेव्हा अस्वल या भाकरीचा उपयोग अन्न म्हणून करतात. 

 

उंदरांची हुशारी
उंदीर अनेक पक्ष्यांची अंडी आपल्या बिळात साठवतात. ही अंडी ते अत्यंत चतुरपणे बिळात आणतात. अंडे दिसले की एक उंदीर आपल्या चारी पायांत ते अंडे छाती-पोटावर धरून पाठीवर उताणा पडतो, दुसरा उंदीर त्याची शेपटी तोंडात धरून त्याला ओढत पार बिळात आणून सोडतो. नदी ओलांडतानाही उंदीर एकमेकांची शेपटी धरून पैलतीर गाठतात. शेपटीचा वापर ते खेकडे धरण्यासाठी करतात. बिळात शेपटी घातली की खेकडा शेपटी धरून वर आला की त्याला उंदीर मारतात.

 

चोर खेकडे
अंदमान बेटावर नारळ चोरणारे खेकडे आढळतात. रात्री ते उंच नारळाच्या झाडावर चढून नांगीने नारळाचे देठ कापून खाली जमिनीवर पाडतात. नंतर ते खाली उतरून शहाळ्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी नांगीने छिद्र पाडून आतील मऊ गर खाऊन फस्त करतात.

 

प्राण्यांचे अनोखे संमोहन

वन्य प्राण्यांच्या बाबतीत संमोहन विद्या ही स्वाभाविक क्रिया आहे. बिबट्या आणि मोर यांची दृष्टादृष्ट झाली तर मोर एखाद्या कठपुतळीप्रमाणे जागीच उभा राहतो. त्याचे सारे लक्ष बिबट्याकडे असते. परंतु सुटून जावे, याचे भान त्याला राहत नाही. बिबट्या जणू संमोहन अस्त्र चालवतो. मुंगूस आणि ससा यांच्या बाबतीत ही हेच घडते. मुंगूस व ससा यांची नजरानजर झाली तर ससा न पळता, तावडीत सापडतो. मुंगूस व उंदीर समोरासमोर आले तर हेच घडते.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...