आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये येणाऱ्या तरूणीकडे व्यक्त केली शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भाजप नेता तथा जिल्हा परिषद सदस्यांचा पती प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी हा पोलिसांना सोमवारी २३ एप्रिलला संध्याकाळी शरण आला. पोलिसांनी मंगळवारी २४ एप्रिलला त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. रेड्डी हा युवतीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द केल्यानंतर त्याला सात दिवसाच्या आत पोलिसांसमोर हजार होण्याचे आदेश दिले होते. 


असे आहे संपूर्ण प्रकरण...
खडकी परिसरातील रहिवासी ३१ वर्षीय युवती एका जीममध्ये जायची. या ठिकाणी न्यू तापडिया नगरात राहणारा तथा जिल्हा परिषद सदस्याचा पती असलेला प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी (४०) याच्याशी तिची ओळख झाली. विक्षिप्त मानसिकतेतील प्रकाश रेड्डी याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु युवतीने नकार दिला, लग्न करण्याची विनंती केली. त्याने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर युवतीच्या वडिलांसोबतही त्याने ओळख निर्माण करून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. वडिलांनी त्यास सहमती दर्शवली. त्यानंतर प्रकाश रेड्डी हा युवतीच्या घरी गेला. त्याने युवतीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकाश रेड्डी हा विवाहित असल्याची माहिती युवतीला मिळाल्यानंतर तिने संबंध तोडले. त्यानंतरही तो तिला त्रास देत होता. एके दिवशी प्रकाश रेड्डी तिच्या घरी बळजबरीने घुसला आणि युवतीला मारहाण, शिवीगाळ करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याचा शोध सुरू करताच आरोपी फरार झाला होता. 


न्यायालयात सादर केले खोटे कागदपत्र...
अटकपूर्व जामिनासाठी आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज केला या वेळी त्याने खोटे कागदपत्र न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिशाभूल करून जामीन मिळवला मात्र त्याने केलेली न्यायालयाची दिशाभूल लक्षात येताच न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला होता व त्याला पोलिसांसमोर सात दिवसात शरण येण्याचे आदेश दिले होते.

बातम्या आणखी आहेत...