आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण कार्यालयामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गोरक्षण रोडवर असलेल्या महावितरणच्या कार्यालयात एका कर्मचाऱ्याचा रविवारी दुपारी गळफास असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात 'साहेब माझ्या जागेवर माझ्या भावाला लावायची जबाबदारी तुमची' असा मजकूर लिहिला आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 


अंकुश बर्वे हे गोरक्षण रोडवरील महावितरणच्या ग्रामीण विभागात कार्यरत होते. रविवारी दुपारी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत कार्यालयात आढळल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच खदानचे पीएसआय शेख हाशम हे घटनास्थळी पोहोचले होते. या वेळी पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना चिठ्ठी दिसली. त्यात 'आई बाबा मला माफ करा, माझे प्रिय साहेब तुम्हीपण मला माफ करा. कारण माझ्याकडे पर्याय नव्हता. साहेब, मी गेल्यावर माझ्या जागेवर भावाला लावायची जबाबदारी तुमची'. असा मजकूर लिहिला आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत. 


पोलिस मृत्यूमागचे गुढ उलगडणार! 
अंकुश यांच्या मृत्यूमागे कारण काय, आत्महत्या केली असेल तर कशामुळे केली. त्यांना कशाचा जाच होता. लिहिलेली चिठ्ठीत त्यांचे हस्ताक्षर आहे काय, याबाबत तपासानंतर अकुंश यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल. 


घटनेची सखोल चौकशी करणार 
महावितरण कार्यालयात कर्मचारी अंकुश बर्वे यांनी आत्महत्या केली. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये संशयास्पद काही नसले तरी सखोल चौकशी करू. 
- शेख हाशम, पीएसआय खदान पो. ठाणे

बातम्या आणखी आहेत...