आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिको सिड्स कंपनीतील बीटी बियाण्यांची इन कॅमेरा तपासणी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर- नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील महिको सिड्स कंपनीतील बीटी बियाणांची तपासणी नमुने घेण्याचे काम अाज दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. यासाठी वरिष्ठ स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांनी नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सर्व प्रकरणाची इन कॅमेरा तपासणी सुरू करण्यात आली आहे. 


बोगस बीटी बियाणांची निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री धानोरा येथील महिको सिड्स कंपनीवर धाड घातली. बीटी बियाणांचा साठा असलेले गोडाऊन सील करण्यात आले. 


अमरावतीचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी डॉ. पंकज चेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी प्रमोद लहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी राऊत डाबरे, जि.प.चे तंत्र अधिकारी सी.एन. पाटील यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारपासून सील केलेल्या गोडाऊनमधील बीटी बियाणांचे नमुने घेणे तपासणी सुरू केली, ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रविवारी सकाळी पुन्हा या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बीटी बियाणांचा प्रचंड साठा असल्याने तपासणी नमुने घेण्याच्या कामाला अजून ते दिवस लागतील, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे अधिकारी बीटी बियाणांचे नमुने इन कॅमेरा घेत असून या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...