आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात अाक्राेश कँडल मार्च काढून केला अांदाेलनाचा निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे महिलेवर बलात्कार करण्यात अाला हाेता. गुजरातमधील सुरत येथेही अशीच घटना घडल्याचे समोर आले. सुरतमधील भेस्तान भागात याच महिन्यात हा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीवर लैंगिक व शारीरिक छळ केला हाेता. या घटनांचा निषेध नाेंदवून पिडितांना न्याय िमळावा, यासाठी कँडल मार्च काढण्यात अाला.

 

काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाेलिसांनी तगडा बंदाेबस्त तैनात केला हाेता. यात रामदासपेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ, वाहतूक शाखेचे प्रमुख िवलास पाटील, एमअायडीसीचे किशाेर शेळके यांचा प्रामुख्याने समावेश हाेता. 


या केल्या मागण्या 
१) चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठाेठावणारा कायदा करण्यात यावा. 
२) िपडितेला सरकारकडून तातडीने १० लाखांची मदत देण्यात यावी. 
३) बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक काेर्टात चालवण्यात यावा. 
४) सुरत, उन्नाव व कटुअा या घटनेतील अाराेपी व त्यांना सहकार्य करणाऱ्यांना कठाेर शिक्षा करण्यात यावी. 


इस्लामी कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी: महाराणा प्रताप चाैकात (सिटी काेतवाली) येथे मुफ्ति अ. रशिद, मुफ्ति गुफरान, प्रतिभा अवचार, निसार शेख, डाॅ. अभय पाटील, कपिल ढाेके, काशिराम साबळे, राजेंद्र पाताेडे यांनी मनाेगत व्यक्त केले. बलात्कार करणाऱ्यांना इस्लामी कायद्यानुसार कठाेर शिक्षा देण्याची मागणी मुक्ती गुफरान यांनी केली. न्यायासाठी अाणखी किती वेळा असे कँडल मार्च काढावे लागतील, असा सवाल यांनी उपस्थित केला. सर्वांनी एकत्र अाल्यास बलात्कारासारखे प्रकार बंद हाेतील, असे मत मुफ्ति अ. रशिद साहब यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन शाहिद रिझवी यांनी केले. 


आंदोलनात सामाजिक संघटनांचा सहभाग: अाक्राेश कँडल मार्चला अनेक संघटना, राजकीय पक्ष व व्यक्तींनी पाठिंबा दिला. यात संभाजी ब्रिगेड, (विभागीय अध्यक्ष पंकज जायले), रिपब्लिकन सेना (देवेश पाताेडे) माळी समाज, तेली समाज, मराठा महासंघ, मनसे, भारिप-बमसं, कुणबी समाज, डाॅक्टर, वकिल, शिक्षकांच्या संघटना अादींनी पाठिंबा दिल्याचे सय्यद जकी मिया शाहीद इकबाल रिजवी, नासीर खान, इमरान चाैहान, गुड्डू मेमन, वसीम जमाली, सय्यद करीम जानी, सय्यद अकरम फरीद शाह, माेबीन चाैधरी, जावेद जकेरिया, फारुख खान, मुन्ना गाैरी सुन्नी युथ विंगेचे शाहीद रिझवी यांनी कळवले. अाक्राेश कँडल मार्चमध्ये डाॅ. अभय पाटील, अमित ठाकरे, कपिल ढाेकेंसह सह भारिप-बमसंचे डी. एन. खंडारे, काशिराम साबळे, राजेंद्र पाताेडे, प्रदीप वानखडे, माजी आ. हरिदास भदे, राजू मियाॅ देशमुख, गजानन गवई, मनाेहर पंजवाणी, सम्राट सुरवाडे, विकास सदांशिव आदींसह कार्यकर्त्यांचा सहभाग होता. 
जन सत्याग्रह संघटनेतर्फे अत्याचारप्रकरणातील अाराेपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात अाले. 


जन सत्याग्रहतर्फे आरोपींच्या पुतळ्याचे केले दहन 
देशात वाढलेल्या बलात्काराच्या घटना थांबवण्यासाठी कठाेर कायदे करण्यात यावे, या मागणीसाठी जन सत्याग्रह संघटनेने अकाेट स्टँड येथे अाराेपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत अांदाेलन केले. पूर्वनियाेजनानुसार खुले नाट्यगृहासमाेर प्रतिकात्मक फाशी अांदाेलन करण्यात येणार हाेेते. मात्र, पाेलिसांनी परवानगी नाकारल्याने प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात अाले. याप्रकरणी पाेलिसांनी अांदाेलकांवर कारवाईही केली. बलात्कारसारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे याचा जन सत्याग्रह संघटनेतर्फे निषेध करण्यासाठी अाणि पिडीतांना न्याय मिळण्यासाठी अांदाेलन करण्यात अाले. यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ अहमद खान यांच्यासह माेठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. 


हातात तिरंगा, फलक, मेणबत्त्या व घाेषणा 
अाक्राेश कँडल मार्चमध्ये युवक, महिला हातात तिरंगा ध्वज, फलक व मेणबत्त्या घेऊन सहभागी झाल्या हाेत्या. मार्चमध्ये सरकाराचा निषेध करण्यात अाला. चुडीया सस्ती कर दाे बाजार मे, हिजडे अाये सरकार में, अशा घाेषणा दिल्या. मार्चमध्ये हजाराे नागरिक सहभागी झाले हाेते. मार्चला प्रारंभ झाल्यानंतरही बायपास, फतेह चाैक, जुने शहरातून शेकडाे युवक-पुरुष सहभागी हाेत हाेते. गर्दी वाढतच गेल्याने सिटी काेतवालीकडून गांधी राेडकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळवण्यात अाली हाेती. 


महिलांचा सहभाग 
अाक्रोश कँडल मार्चमध्ये महिला व तरुणांचा लक्षणीय सहभाग हाेता. मार्चला धिंग्रा चाैकातून प्रारंभ झाला. मार्च डाॅ. अांबेडकर खुले नाट्य गृह, गांधी राेड व महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली) या मार्गाने काढला. याठिकाणी सभा झाली. मार्चमध्ये जि. प. अध्यक्षा संध्या वाघाेडे, शाेभा मनाेहर शेळके, प्रतिभा अवचार, प्रा. मंताेष माेहाेड, नरगसेविका किरण बाेराखडे अादी सहभागी झाल्या. 

बातम्या आणखी आहेत...