आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलसीबीच्या पथकाने अट्टल चेन स्नॅचरला घेतले ताब्यात; महिलांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अट्टल चेनस्नॅचर राम उर्फ सुनील मधुकर गावंडे याला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी)ने गुरुवारी ताब्यात घेतले. सिटी कोतवालीच्या हद्दीतील मंगळसूत्र चोरीचा गुन्हा आरोपीने कबूल केल्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखा शहरासह जिल्ह्यात घडलेल्या मंगळसूत्र चोरी व सोनसाखळी गुन्ह्यांचा तपासाच्या अनुषंगाने आरोपीची चौकशी करणार आहेत. 


आरोपी राम गावंडे याने महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याने ज्या सराफांना चोरीचे सोने विकले त्याचेही नाव उघड केले. त्यानंतर पोलिसांनी सराफा व्यावसायिक जितेंद्र विसपुते याला ताब्यात घेतले होते. त्यानेसुद्धा चोरीचे सोने विकत घेतल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. सराफाकडून पोलिसांनी ते सोने जप्त केले. त्यानंतर न्यायालयाने सराफाची जामीनावर सुटका केली. मात्र मुख्य आरोपी राम गावंडे याला कारागृहात धाडले. गुरुवारी एलसीबीने आरोपी राम गावंडे याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास एलसीबी प्रमुख तथा पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रणजितसिंह ठाकूर, पोलिस कॉन्स्टेबल शक्ती कांबळे करीत आहेत. 


फुटेजमध्ये आरोपी चेहरा साधर्म्य 
एलसीबीने शहरामध्ये घडलेल्या चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज काढले आहेत. त्यावरून आरोपीचे रेखाचित्र तयार केले. त्या फोटोतील आरोपीचा चेहरा मिळताजुळता वाटत असल्याने पोलिस आरोपीची सखोल चौकशी करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...