आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या बाहेर निघाल्या देशी कट्ट्यासह तलवारी, 2 गटात बाचाबाची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - एका न्यायप्रविष्ठ प्रकरणात साक्ष दिल्याच्या कारणावरून दोन गट न्यायालयाबाहेर एकमेकांसमोर उभे ठाकले. एकाने पिस्तूल रोखले तर प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटाने तलवारी काढल्या. हा थरार गुरुवारी दुपारी न्यायालयाबाहेर घडला. एलसीबी पोलिसांच्या सतर्कतेने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

 

जुन्या शहरात दोन गटातील वाद आज न्यायालयाबाहेर उफाळून आला. त्यातील एका गटाच्या संबंधातील प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. या प्रकरणात दुसऱ्या गटातील एक युवक साक्ष देण्यासाठी न्यायालयात गेल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांना बोलावून घेतले. दोन्ही गटातील युवक न्यायालयाबाहेर जमले.


त्यातील एकाने दुसऱ्या गटातील युवकावर देशी कट्टा रोखला. तर दुसऱ्या गटातील युवकांनी तलवारी काढल्या. या घटनेची माहिती न्यायालय पोलिस चौकीत कार्यरत पोलिस कर्मचारी पियुश गाडगे यांनी एलसीबीचे प्रमुख कैलास नागरे यांना दिली. तत्काळ कैलास नागरे, एपीआय प्रकाश झोडगे, हसन शेख, शक्ती कांबळे, अशोक चाटी, विजय मुलनकर, अमित दुबे, संदीप काटकर, अश्विन सिरसाट यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरित आरोपींची शोधमोहीम सुरु केली. त्यात पोलिसांनी शेख इरफान शेख हारुण, ईरशाद खान उर्फ शाहरूख खान, जमीर खान अाझाद खान व एका अल्पवयीन आरोपीला अटक केली. तर शेखा उमर शेखा हारूण हा फरार आहे. अटक केलेल्या आरोपीकडून दोन तलवारी व एक देशीकट्टा जप्त केला. या प्रकरणाचा मास्टरमांईडचा शोध पोलिस रात्री उशिरापर्यंत घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...