आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्काऱ्यांना मृत्यू दंडच द्या...! चिमुकलीवरील अत्याचाराच्या विराेधात काढला कँडल मार्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- देशभरात चिमुकल्या मुली व महिलांच्यावर हाेत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या विराेधात रविवारी अकाेलेकरांनी कँडल मार्च काढला. बलात्काऱ्यांना मृत्यू दंडच द्या, असे हातात फलक घेऊन विविध संघटना व राजकीय पक्षांनी लेकींवर हाेत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला. 


जम्मू काश्मिरच्या कठुआ, उत्तर प्रदेशच्या उन्नाव, महाराष्ट्रातील दाेंडाई, काेपर्डी अाणि गुजरातमधील सूरत येथील सामूहिक अत्याचाराच्या घटना घडल्या हाेत्या. निषेध करण्यासाठी रविवारी सायंकाळी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांकडून कँडल मार्च काढण्यात अाला. मार्चला महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली) येथून सुरुवात झाली. हा मार्च गांधी राेड, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर खुले नाट्यगृह, मदनलाल धिंग्रा चाैक, मुख्य डाक घर या मार्गाने काढण्यात अाला. समाराेप अशाेक वाटिकेनजीक झाला. समाराेप प्रसंगी पिडीतांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताचे गायन झाले.

 
मेणबत्त्यांची अशीही व्यवस्था... 
संपूर्ण कँडल मार्चमध्ये मेणबत्त्या तेवत राहाव्यात, यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात अाली. एका चार चाकी गाडीत कागदाच्या डिस्पाेझल ग्लासमध्ये विना पेटलेल्या मेणबत्त्या ठेवण्यात अाल्या हाेत्या. माेर्चादरम्यान अनेक ठिकाणाहून नागरिक सहभागी हाेत हाेते. या नागरिकांना मेणबत्त्या देण्यात येेत हाेत्या. 


तरुणाईचा लक्षणीय सहभाग

चिमुकल्या मुली व महिलांच्यावर हाेत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या विराेधात काढण्यात अालेल्या कँडल मार्चमध्ये तरूणाई व महिलांचा लक्षणीय सहभाग हाेता. यापूर्वी शुक्रवारीही मदनलाल धिंग्रा चाैक ते महाराणा प्रताप चाैकापर्यंत काढण्यात अालेल्या कँडल मार्चला तरुणाईचा उदंड प्रतिसाद लाभला हाेता. मार्चच्या समाराेप ठिकाणी पेटत्या मेणबत्त्यात ठेवण्यासाठी टेबलची व्यवस्था करण्यात अाली हाेती. 


वाहतुकीची काेंडी 
कँडल मार्च मुख्य डाकघरासमाेरुन चर्च जवळून अशाेक वाटिकेनजिक पाेहाेचला. मार्च विरुद्ध दिशेने नेण्यात अाला. या वेळी वाहतुकीचा वेग मंदावला. पाेलिसांनी काही वेळ अशाेक वाटिकेकडून मुख्य डाकघराकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली हाेती. कँडल मार्चदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता. 

बातम्या आणखी आहेत...