आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार्टमेंटसाठी बांधण्यात आलेल्या टाक्यात पडून चौकीदाराचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील दिवेकर चौकात उभारण्यात येणाऱ्या अपार्टमेंटला लागणाऱ्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यात बुडून चौकीदाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

 

स्थानिक दिवेकर चौकात एका अपार्टमेंटचे बांधकाम सुरु आहे. शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या टाक्याचा वापर इमारतीला लागणाऱ्या पाण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे हे टाके पाण्याने भरून होते. याच इमारतीवर चौकीदार असलेले अनिल दत्तात्रय सोनटक्के वय ५२, यांचा बुडून मृत्यू झाला. पाण्याच्या टाकीतून दुर्गंधी येत असल्याने गुरुवारी पाण्याच्या टाकीत डोकावून बघितले असता कुजलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी ठाणेदार अन्वर एम. शेख व एपीआय सोळंके दाखल झाले. त्यांनी मृतदेह बाहेर काढून घटनेचा तपास सुरु केला आहे. 

 

जेवणानंतर डबा धुताना पडले असावे : अनिल सोनटक्के यांनी जेवण केल्यानंतर पाण्याच्या टाक्यात डबा धुण्याचा प्रयत्न केला असावा. त्यातच त्यांचा तोल गेल्याने ते पडले असावे, कारण पाण्याच्या टाक्यात डबा दिसून आल्याने असा अंदाज आहे. 

बातम्या आणखी आहेत...