आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यांचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे जाण्यासाठी नाक काेणी घासले? दीपक केसरकरांची राणेंवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- ‘अापल्यावरील गुन्ह्यांचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे जाऊ नये, यासाठी जमिनीवर नाक काेणी घासले, हे महाराष्ट्राने पाहिले असून, नारायण राणे यांची उपयुक्तता शिवसेनेवर टीका करण्याएवढी राहिली अाहे,’ अशा शब्दात शिवसेना नेते, गृह, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली. 

 

तीन वर्षांपासून शिवसेना नाक घासत असून. सत्तेतून बाहेर पडली नाही, अशी टीका राणे यांनी केली हाेती. त्यावर अमरावती येथे जाण्यासाठी अकोल्यात अालेल्या केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पलटवार केला. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य अार्थिकदृष्टया सक्षम असल्याचेही ते म्हणाले. दीपक केसरकर यांनी झालेल्या विधान परिषद निवडणुकीवर भाष्य करीत नारायण राणेंना टाेले लगावले. स्वत:च खाली केलेली जागा भाजपबरोबर जात असलेल्या पक्षानेही त्यांना दिली नाही, याचीही जाणीव राणेंना नाही. त्यामुळे काेणाचे नाक कापले , हे राज्याने पाहिले अाहे. 


शिवसेना कधीच सत्तेसाठी धावली नाही. सत्ता असाे की, नसाे शिवसेना सामन्यांसाठी काम करीत असून, पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी धावलेच. बाळासाहेब ठाकरेंनी माेहळ निर्माण केले, असेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे अामदार गोपीकिशन बाजाेरीया, माजी अामदार संजय गावंडे, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख अादी उपस्थित हाेते. 


भाजपवर सूचक वक्तव्य
नारायणराणेंचा बोलवता धनी भाजप अाहे काय, या प्रश्नावर केसरकर यांनी भाजपला उद्देशून सूचक वक्तव्य केले. भाजप शिवसेनेचा मित्र पक्ष असून, तिकडून वक्तव्य हाेईपर्यंत शिवसेनेने बाेलण्याचं कारण नाही. तरीही शिवसेनेवर टीका करण्यासाठी उसने घेतले असल्यास त्यांनी तसे सांगावे. त्यानंतर अाम्ही बाेलू. उत्कृष्टपणे राज्य कारभार व्हावा, यासाठी जनतेने भाजप- शिवसेनेला काैल दिला; अन्यथा भाजपलाच काैल मिळाला असता. दाेघांनाही एकत्रितपणे जनतेच्या हितासाठी राज्य कारभार करावा लागेल. अामदार, मंत्री अशा वैयक्तिक महत्त्वाकाक्षांचा जनतेच्या प्रश्नांशी संबंध नाही, असा टाेलाही त्यांनी राणेंना त्यांचे नाव घेता लगावला. 

बातम्या आणखी आहेत...