आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय, हक्कासाठी धनगर समाजाने एकसंघ व्हावे; माजी आमदार हरिदास भदे यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूर्तिजापूर- धनगर समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्या अद्यापही मंजूर झाल्या नाहीत. शासनाने आश्वासने दिलीत मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे धनगर समाजबांधवांनी एकसंघ होऊन लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी ११ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन त्याकरिता गावागावातून समाजबांधवांनी एकजुट दाखवून सरकारला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता भाग पाडा, असे आवाहन माजी आमदार हरिदास भदे यांनी केले. 


मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे धनगर समाजाचा सत्कार सोहळा, मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी आमदार हरिदास भदे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दिनकरराव नागे, साहेबराव पातोंड, श्रीकृष्णजी साणे, डाॅ. वसंत मुरळ, प्रा. बाळासाहेब सरोदे, प्रा. गजानन जोगळे, सुरेश जोगळे, अशोक तिरकर, सुनील सरोदे, विलासराव ईसळ (मुंबई), महादेवराव तिरकर, विनोद नागे, मोहन रोकडे, सुनील पंडितसर, योगिताताई रोकडे, श्याम अवघड, अरविंदराव गाडवे या सर्वांची समयोचित भाषणे झाली. 


साहेबराव पांतोडे यांनी ग्रा.पं. सरपंच सदस्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हटले की, त्यांनी गावाच्या विकासात्मक कामावंर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रा. एल. डी. सरोदे तर प्रास्ताविक मोहन रोकडे यांनी केले. आभार सुधीर डांगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनील पंडितसर, प्रा. बाळासाहेब सरोदे, प्रा. गजानन जोगळे, सुनील सरोदे, मोहन रोकडे, विनोद नागे, दिलीपराव पंडित, नानाभाऊ शितोडे, विष्णूपंत चुडे, सुधीर डांगे, सुनील डांगे, बाळाभाऊ शितोडे, रविभाऊ मार्कंड, विशाल मोटे, अशोक तिरकर, राहुल रोकडे, श्याम अवघड, श्याम हेगंड, गिरिश अवघड, संजय उघडे, गजानन गोळंबे, मंगेष सातिंगे, मंगेश डांगे आदिंनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततेने पार पडला. 


भाजप-शिवसेनेने केली समाजाची दिशाभुल 
धनगरसमाजाची अनु. जमातीच्या सवलती लागू करण्याची अमंलबजावणी करण्याचे आश्वासन भाजप - सेना युतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. ते अद्यापही पूर्ण केले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी धनगर समाजाला लेखी पत्र दिले होते. शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी धनगर समाजाला अनु.जमातीच्या आरक्षणाची अंमलजबजावणी करण्याचे लेखी आश्वासन देऊनही तीन वर्ष पूर्ण होत असताना आज संशोधनाचा आधार घेण्याची भाषा मुख्यमंत्री बोलतात तर शिवसेना याबाबत काहीही बोलायला तयार नाही. म्हणून भाजप- शिवसेनेने धनगर समाजाची दिशाभूल केली, असा आरोप माजी आमदार हरिदास भदे यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...