आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची निघाली दिंडी; नवरत्न पुरस्काराचेही करण्यात आले वितरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळाचे वतीने आज रविवार, १० डिसेंबर रोजी बुलडाणा शहरातून ग्रामगीतेची दिंडी काढण्यात आली. तर नवरत्न पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. 


सकाळी ९.३० वाजता गांधी भवन येथे दिंडीचे उद््घाटन जिल्हा प्रचारक दीपक महाराज सावळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी के.एस.वाकोडे, रेखा खरात, गंजीधर पाटील, निवृत्तीदादा घोंगटे, प्रमोद दांडगे, शाहीर हरीदास खांडेभराड यांचे उपस्थितीत करण्यात आले. 


गांधीभवन या ठिकाणी नवरत्न पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन राधेश्याम चांडक यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ.उध्दवराव गाडेकर, निवृत्ती घोंगटे, दि.दा.पाटील, भगवान राईतकर दादा, हटकर दादा, के.एस.वाकाडे,दीपक महाराज सावळे, गंजीधर गाढे यांची उपस्थिती होती. या वेळी नवरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये वासुदेव देशपांडे, शिवनारायण पोफळकर,जगदेव पवार, अरुण जाधव, शाम सावळे, प्रा.किशोर जाधव, जोशीताई, प्रतिभा भुतेकर, अतुल जोशी, प्रा.घेवंदे सर, शैलेश काकडे, उत्तम बुरकुल, पवन जाधव, सवडदकर, प्रशांत आढाव, डॉ.बाहेती, विलास वानखेडे, रागेश वानखेडे, श्रीराम खेडेकर, प्रमोद दांडगे, दीपक सावळे, शाहीर हरीदास खांडेभराड या नवरत्नांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंजीधर गाढे यांनी केले. संचालन शाहीर हरीदास खांडेभराड यांनी तर आभार प्रदर्शन दीपक सावळे महाराज यांनी केले. 

 

कार्यक्रम यशस्वितेसाठी गणेश डोईफोडे, अजय बोहरा, काशीराम निकम, मोतीराम निकम, गजानन तरमळे, नंदु कानडजे, शालीकराम कानडजे, सदाशिव बाहेकर, मधुकर बोरपी, मंगलसिंग राठोड, दळवी, शिरीष तायडे, बापु सुरडकर, समाधान जंजाळ, भारुडकार, दादा झगरे आदींनी सहकार्य केले. 

बातम्या आणखी आहेत...