आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, डॉक्टरांनी केली 100 जणांची तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सतत बंदोबस्त व अतिरिक्त कामाचा ताणामुळे पोलिसांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्याच्या तपासण्या करणे त्यांना शक्य नसल्याने एकाच ठिकाणी सर्व तपासण्या करण्याचा निर्णय खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी घेतला. त्यांनी शहरातील तज्ञ डॉक्टरांना गुरुवारी खदान पोलिस ठाण्यात बोलावून सर्वच पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली. पोलिसांचे आरोग्य चांगले तर समाजाचे आरोग्य चांगले, याच भावनेतून आरोग्य शिबिर घेण्यात आल्याच्या भावना डॉक्टरांनी व्यक्त केल्या. 

 

महाराष्ट्र पोलिस कल्याण सप्ताहाचे औचित्य साधून खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी पोलिस ठाण्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये चर्मरोग तज्ज्ञ डॉ. वैभव टापरे, मानसिक रोग तज्ज्ञ श्रेयस पेंढारकर, समुपदेशक डॉ. प्रिती पेंढारकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाम देविकर, सहकार सिटी स्कॅनचे डॉ. स्वप्निल ठाकरे, निदान पॅथॉलॉजीचे डॉ. राजेश काटे यांनी पोलिसांच्या शारीरिक तपासण्या केल्या. डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी पोलिसांना आहार विहाराविषयी माहिती दिली. तर अॅड. शिवम शर्मा यांनीसुद्धा आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी उमेश माने पाटील यांनीसुद्धा शारीरिक तपासणी केली. या कार्यक्रमाचे संचालन ठाणेदार संतोष महल्ले यांनी केले. यावेळी आरोग्य शिबिरामध्ये जवळपास १०० पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...