आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषक समाजाच्या चेअरमनपदी डॉ. प्रकाश मानकर बिनविरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाजाच्या चेअरमनपदी डॉ. प्रकाश मानकर यांची बिनविरोध निवड झाली. जळगावला झालेल्या संचालकांच्या बैठकीत ही निवड झाली. डॉ. रमेश ठाकरे नागपूर, भारत गावंडे, बारामती, रवींद्र पाटील कोल्हापूर, प्रशांत चौधरी जळगाव यांची उपाध्यक्षपदी, सचिवपदी वसंतराव महाजन यांची फेरनिवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी विक्रीकर आयुक्त जी. जी. चैाधरी होते. आभार वसंतराव महाजन यांनी मानले. सिंधूदुर्ग जिल्ह्यात झालेल्या कौन्सिलर बैठकीत २१ संचालकांची निवड झाली. 


डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे, भारत गावंडे, रवींद्र पाटील, प्रशांत चौधरी, वसंतराव महाजन, विश्वासराव पाटील, जगतराव पाटील, सुभाष पाटील , शेषराव पाटील चिखलीकर, गोविंद पाटील, प्रा. प्रदीप साळुंखे धुळे, प्रशांत वानखेडे वर्धा, बाळासाहेब वैद्य अमरावती, डॉ. उदय बलदोटा अहमदनगर, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील जळगाव, विनायक बारी पालघर, प्रा. अनिल धामोडे गडचिरोली, विवेक शेंडगे सांगली, एस. एस. पाटील नाशिक यांची निवड झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...