आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संघटना युवा आघाडी विदर्भ प्रमुखपदी डॉ.नीलेश पाटील यांची नियुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शेतकरी संघटना युवा आघाडी विदर्भ प्रमुखपदी डॉ.नीलेश पाटील यांची नियुक्ती शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल घनवट युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष सतिष दाणी यांनी केली. निवडीची घाेषणा शेगाव येथे मंगळवारी संपन्न झालेल्या शेतकरी संघटनेच्या ऐतिहासिक शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यात करण्यात अाली. शेतकरी स्वातंत्र्य मेळाव्यात शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 

 

शरद जोशी यांनी दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा संदेश शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला. मेळाव्या दरम्यान कल्पक युवा नेते डॉ.नीलेश पाटील यांची युवा आघाडी विदर्भ प्रमुखपदी नियुक्ती कण्यात अाली. शरद जोशींनी दिलेला शेतकरी स्वातंत्र्याचा भारत उत्थानाचा विचार संपूर्ण विदर्भात पोहोचवून शेतकरी स्वातंत्र्याच्या विचारांशी संकल्पित कार्य करू असा निर्धार डॉ पाटील यांनी नियुक्तीनंतर केला. 

बातम्या आणखी आहेत...