आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीमुळे रुळावरून जाणाऱ्या तीन महिलांना ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - अधिक मास संपण्यास केवळ तीन दिवसांचा अवधी बाकी असल्याने एकादशीनिमित्त शेगावी श्रींचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या तीन महिलांचा दोन तास उशिरा धावणाऱ्या पॅसेंजरमध्ये चढण्याच्या गडबडीत रेल्वे क्रॉस करताना  चेन्नई एक्स्प्रेसने  बळी घेतला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज रविवारी शेगाव रेल्वेस्टेशनवर घडली.      
एकादशी असल्याने रविवारी शेगावात श्रींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. त्यातच बस कर्मचाऱ्यांनी संपाचा बडगा उगारल्याने प्रवाशांचा ओढा रेल्वेकडे वाढला होता.  शिवाय, रविवारी प्रवाशी संख्या  जास्त असल्यामुळे पॅसेंजर गाडी दोन तास उशिराने धावत होती. 

 

रविवारी सकाळी ११ वाजेदरम्यान भुसावळ- नरखेड पॅसेंजरने भुसावळकडून अनेक भाविक दर्शनासाठी शेगावला आले होते. गाडी क्रमांक एकच्या फलाटावर थांबली आणि प्रवासी उतरून निघून गेले. मात्र, दादऱ्यावर प्रचंड गर्दी असल्यामुळे काही प्रवासी बेकायदेशीरपणे रेल्वे रुळावरूनच येणे-जाणे करत होते. 


दरम्यान, नांदुरा तालुक्यातील सरिता साबे, संगीता गोळे आणि चांदबाई तिसरे यासुद्धा अशाच प्रकारे रेल्वे रुळावरून निघाल्या. परंतु त्यांना काही कळायच्या आतच चेन्नई-जोधपूर ही अतिजलद एक्स्प्रेस त्या रुळावरून आल्या आणि त्याखाली या तिघीही चिरडल्या गेल्या. यात त्यांच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या, तर अन्य एक महिला या घटनेत जखमी झाली असून त्यांच्यावर शेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिला रेल्वेतून प्रवास करत असल्याचे त्यांच्याकडे  शेगाव- नांदुरा असे भुसावळ पॅसेंजरच्या तिकिटावरून कळाले. 

 

या गाड्या हावडा एक्सप्रेस अपघातामुळे केल्या रद्द   
इगतपुरीजवळ रेल्वे डबे घसरल्याने राज्य राणी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. भुसावळ-मंंुबई पॅसेंजर ही गाडी नाशिकरोड रेल्वेस्थानकापर्यंत धावली होती. रविवार असल्याने चाकरमान्यांना साप्ताहिक सुटी होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असली तरी आता सुट्या संपल्याने घराकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय झाली होती.  


या गाड्यांचा मार्ग वळवला  
मुंबई-अमृतसर, गुवाहाटी एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस या गाड्या मनमाड-दौंडमार्गे वळवण्यात आल्या होत्या, तर मुंबई-वाराणसी एक्स्प्रेस,  पाटलीपुत्र एक्स्प्रेस, पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस, हाटिया एक्स्प्रेस या गाड्या वसई सुरत-जळगावमार्गे वळवण्यात आल्या होत्या.     

बातम्या आणखी आहेत...