आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागलीसाठी गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार; अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगाव- शेतातील पिकाची राखण करण्यासाठी रात्री जागलीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना राळेगाव तालुक्यातील सावरखेडा पळसकुंड विहिरगावच्या मध्ये शनिवारी दुपारी वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शिवराम चंडकु भोनु फुटकी वय ५० वर्षे रा. सावरखडा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 


या प्रकरणी सविस्तर असे की, शेतात असलेल्या पिकाची राखण करण्यासाठी शिवराम हे गेल्या काही दिवसांपासून शेतात जागलीसाठी जात होते. त्यातच ते शुक्रवारी रात्री शेतात गेले मात्र शनिवारी दुपार होवुनही ते परत आल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी गावकऱ्यांसोबत त्यांचा शोध सुरू केला.


यावेळी दुपारी वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह वाघाने अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. गेल्या वर्षभरात राळेगाव आणि कळंब तालुक्यातील ११ जणांचा बळी वाघाने घेतला असुन आत्तापर्यंत या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात आलेले नसल्याची ओरड यावेळी नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यातच पुन्हा हा प्रकार घडल्याने नागरिकांमधून वन विभागाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता. मृत शेतकऱ्याला मुली असुन एका मुलीचे लग्न झालेले आहे. त्याच्याकडे एकर शेती होती. मात्र त्याच्या मृत्युमुळे परिवारातील कर्ता माणुस गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...