आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला-अमरावतीत वनोद्यानांची रेलचेल; दहा वनोद्याने विकसित होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/अकोला- नैसर्गिक वनसंपदेने परिपूर्ण अमरावती-अकोला परिसरात मेळघाट, काटेपूर्णा, ज्ञानगंगा या व्याघ्रप्रकल्पांच्या जोडीला वनोद्यानांचाही (फॉरेस्ट पार्क) विकास करण्यात येणार आहे. वनविभाग, पुरातत्त्वशास्त्रविभाग, पर्यटन महामंडळ यांच्या सहयोगातून १० वनोद्याने विकसित केली जातील. 


अमरावती विभागातील मोर्शी येथे इको टूरिझम सेंटर तयार केले जाणार आहे.अकोला येथे चार वनोद्यानांची योजना आहे. येत्या पाच वर्षांत या योजना कार्यान्वित होतील आणि व्याघ्रप्रकल्पांप्रमाणेच नव्याने विकसित विभागालाही इको टूरिझमचे नवे परिमाण मिळणार आहे. 


अमरावती सर्कलमधील ही स्थळे विकसित होणार 
लोणार अभयारण्य, ऑक्सिजन पार्क, चिखलदरा उद्यान, वडाली बांबू उद्यान, चिखलदरा येथील गाविलगड किल्ला, मोर्शी इको टूरिझम सेंटर, मलकापूर इको टूरिझम सेंटर, धारणी वनोद्यान,नांदगाव खांडेश्वर जैवविविधता उद्यान, सिंदखेडराजा वनोद्यान. मेळघाट व्याघ्रप्रकल्प, काटेपूर्णा आणि ज्ञानगंगा अभयारण्य येथे पर्यटकांसाठी अधिकाधिक निसर्गपूरक सुविधांची उभारणी केली जाईल. प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोकांना योजनेत सहभागी करून घेतले जाईल. रोजगारनिर्मितीत त्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक स्थळाची नैसर्गिक परिसंस्था (इकॉलॉजी) अबाधित राखली जाईल. 

बातम्या आणखी आहेत...