आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, पतीने पत्नी आणि चिमुकल्या मुलासोबत केले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन कुऱ्हाडीने वार करून पत्नी आणि चिमुकल्या मुलाचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल आज, २६ एप्रिल रोजी खामगाव न्यायालयाने दिला. 


संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील नूर मोहम्मद शेख हबीब वय २९ याने २३ एप्रिल २०१४ च्या रात्री पत्नी सादेकाबी वय २६ हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी वाद घातला व कुऱ्हाडीने पत्नी सादेकाबी आणि मुलगा मुदसिर वय २ या दोघांवर वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी मृतक सादेकाबीची आई नशिबाबी जरीतखान यांच्या तक्रारी वरून सोनाळा पोलिसांनी नूर मोहम्मद शेख हबीबविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय सोनोने यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. 


याप्रकरणी न्यायालयाने एकुण १४ साक्षीदार तपासले. यामध्ये पोलीस पाटील रवींद्र वानखडे आणि आरोपीची बहिण तौराबी यांची साक्ष महत्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अति. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश व्ही. एम. पथाडे यांनी आरोपी नूर मोहम्मद यास दोषी ठरवून त्यास जन्मठेप व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. वसंत भटकर यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...