आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार; सदाभाऊ खोत यांचे सष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आगामी निवडणुकीत खासदार व्हावे की आमदार हा निर्णय मी मुख्यमंत्र्यांवर सोपवला असून ते म्हणतील तोच माझा मतदारसंघ असेल, अशी स्पष्टोक्ती कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.     


अमरावती विभागाचा कृषी आढावा घेण्यासाठी मंत्री खोत यांनी शनिवारी दुपारी अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर मनमोकळ्या भावना मांडल्या. तुम्ही माढा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढणार का, असा प्रश्न त्यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना काही क्षणांचे मौन बाळगून सदाभाऊ दिलखुलासपणे बोलते झाले. ते म्हणाले, मी आमदार व्हावे की खासदार हे मुख्यमंत्र्यांवर सोपवले असून ते म्हणतील त्या मतदारसंघातून मी निवडणूक लढेन. अर्थात भाजपकडून... हा प्रश्न येण्यापूर्वीच त्यांनी मी भाजपचाच उमेदवार असेन, हेही स्पष्ट केले. 

 

सदाभाऊंचे काही महिन्यांपूर्वी स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्याशी खटके उडाले. त्यामुळे त्यांनी वेगळी चूल मांडली असून भाजप-सेनेच्या सरकारमधून बाहेर पडण्यास स्पष्ट विरोध दर्शवला होता. 

बातम्या आणखी आहेत...