आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा- बुलडाणा लोकसभेमध्ये शिवसेनेतील गटबाजी बघता ती मिटली तरच विजयाच्या जवळपास पोहोचण्यासाठी कमी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ही गटबाजी मिटविण्याशिवाय पर्याय नसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतापराव यांना 'विजयराज शिंदे यांचा प्रश्न मिटवा किंवा मिटवून घ्या, असा आदेशच दिल्यामुळे नागपूरमध्ये बुलडाण्यातील कुरबुरीचे राजकारण चांगलेच तापले! त्यातच उद्धव ठाकरे यांनी मला बुलडाण्यात "विजय" पाहिजे. असे म्हटल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने नागपूर येथे विदर्भातील पदाधिकारी, खासदार, आमदारांांची आढावा बैठक आयोजित करण्यात अाली होती. या वेळी स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्षाची स्थिती काय राहील. याची माहिती ठाकरे यांनी घेतली होती. या दरम्यान खा.प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेच्या सर्वेक्षणामुळे पक्षाचे नुकसान होत असून, तशा बातम्या प्रसिद्ध झाल्याचे सांगत "दिव्य मराठी" चे उदाहरणही दिले. त्यामुळे या ठिकाणी सर्वेक्षणावर चर्चा होऊन या बाबतच त्वरित खुलासा करण्याची विनंतीही प्रतापराव जाधव यांनी केली. या दरम्यान चर्चा सुरु असतानाच प्रतापराव, विजयराज शिंदे यांचा प्रश्न मिटवून टाका किंवा मिटवा असा आदेशच देऊन लोकसभेच्या जय पराजयाची माळ खासदारांच्या गळयात उद्धव ठाकरे यांनी टाकल्यामुळे शिवसेनेत आगामी काळात काय हालचाली होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी विदर्भातील सर्वच जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हयात माजी आमदार विजयराज शिंदे यांना एकाकी टाकणे असे असताना बुलडाण्याच्या प्रश्नावर विजयराज शिंदे यांचेबद्दलच प्रतापरावांना आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ताणून ताणून तोडायचे की मोडत आलेले जोडायचे हा प्रश्न खा.प्रतापराव जाधव कोणते सोल्युशन वापरून मजबूत जोडतात की 'तुटेगा, नही म्हणण्याची वेळ न येण्यासारखे जोडतात. याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.
सेनेचे चार आमदार निवडून आणणार
संपर्कामुळे लोक वाढतात. परंतु, संपर्क नसल्याने सध्या लोकसभा शिवसेनेला स्वबळावर जड जाणार हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यातच उद्धव ठाकरे यांना चार आमदार जिल्ह्यातून निवडून आणणार असे वचनच खा.प्रतापराव जाधव यांनी दिले. त्यामुळे मेहकर मधून आ.डाॅ.संजय रायमूलकर, चिखलीतून प्रा.नरेंद्र खेडेकर, सिंदखेड राजातून आ.डॉ.शशिकांत खेडेकर असे तीन आमदार लक्षात आले. परंतु, बुलडाण्यातून विजयराज तर नाही ना?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.