आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडू मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या 'त्या' कोचच्या कोठडीत वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉलमध्ये बॅडमिंटन कोच राहुल सरकटे याने खेळाडू मुलींचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी तो पोलिस कोठडीत आहे. पोलिस कोठडी संपल्याने त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत २२ मे पर्यंत वाढ केली आहे. 


पीडित मुलीचे अश्लील छायाचित्र काढून तिचा सतत तीन वर्षांपासून आरोपी छळ करीत असल्याचे समोर आले आहे. अश्लील छायाचित्रांचा धाक दाखवून राहुल सरकटे याने या मुलीवर तीन वर्षांपासून बलात्कार केला आहे. तक्रार कर्त्या मुलीसह आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले असल्याची कबुली त्याने दिली; मात्र या मुली बदनामीच्या भीतीपोटी तक्रारीसाठी समोर आलेल्या नाहीत. राहुल सरकटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला १९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, त्यानंतर आरोपीला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत मंगळवार २२ मे पर्यत वाढ केली आहे. 


आयएमए सभागृहाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कारवाईस टाळाटाळ 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही सदर प्रकरण सहा महिन्यांपूर्वीच दडपल्याने त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यास पोलिसांनी टाळाटाळ सुरु केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेउन सांगितले, मात्र अद्यापही कठोर कारवाई करण्यात आली नाही. 


चार पीडित खेळाडू मुलींचे घेतले बयाण 
स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी चार मुलींचे बयाण घेतले आहे. या मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. तर आयएमएच्या पदाधिकाऱ्यांची अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

बातम्या आणखी आहेत...