आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला-अकोट मार्गावर बस उलटली; बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना असे काढले बाहेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- अकोट मार्गावर रविवारी सकाळी 11.30 वाजता उगवा फाट्याजवळ एसटी बस (MH 40 Y 5328) बस उलटली. काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना तत्काळ बसमधून बाहेर काढण्यात आले आहे.

 

अकोल्याहून अकोटकडे ही बस जात असताना उगवा फाट्याजवळ हा अपघात झाला. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु होते. त्यामुळे ओलसर रस्त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून बसमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो आणि व्हिडिओ..