आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरवाडीत जाऊन पत्नी, सासरा, मेहुण्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला/बाळापूर- ९ मे राेजी धाेतर्डी येथे पित्याने पोटच्या तीन मुलांचा खून केला होता. या घटनेला सहा दिवस उलटत नाही, ताेच १६ मेच्या मध्यरात्री नांदायला पाठवत नसल्याचा रागातून संतापलेल्या जावयाने सासरवाडीत जाऊन पत्नी, सासरा आणि मेहुण्याचा चाकून भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 


गेल्या काही दिवसापासून पत्नी माहेरी होती. तिला तिचे आई-वडील व भाऊ आपल्यासोबत नांदायला पाठवत नाही, या कारणावरून पतीने पत्नी, सासरा, मेहुणा या तिघांना चाकूने भोसकून ठार केले. ही घटना बुधवारी रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान बाळापूर येथील आबाद नगरात घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


आरोपी सै.फिरोज सै. रज्जाक हा बार्शीटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी सै.फिरोज सै. रज्जाक हा बाळापुरात येऊन वाद घालत होता. हाच राग अनावर झाल्यामुळे आरोपी जावयाने बुधवारी रात्री सासरवाडीत जाऊन वाद घालून पत्नी शबाना परवीन (वय-३० ), सासरा शेख मेहबूब ( वय- ६५) आणि मेहुणा महंमद फिरोज ( वय-२७) या तिघांना चाकूने भाेसकून ठार मारले. या घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार विनोद ठाकरे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपी सै. फिरोज याचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पत्नी शबानाला गळफास देण्याचा केला होता प्रयत्न 
आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर २०१६ मध्ये खुनाचा गुन्हाही दाखल झालेला आहे. तो नेहमीच पत्नी शबानाला मारहाण करीत असे. एकदा त्याने तिला गळफास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या छळाला पत्नी कंटाळली होती. म्हणून ती माहेरी राहत होती. 


जावयाचा रुद्रावतार पाहून सासू पळाली 
आरोपीला चार मुली आहेत. त्यातील दोघींचे लग्न झाले आहे. तर लहान मुलींमध्ये एक सात वर्षांची तर दुसरी पाच वर्षांची आहे. या दोन्ही त्याच्याकडेच राहत आहेत. बुधवारी संध्याकाळी दोन्ही मुलींना घेऊन सासरी आला होता. यावेळी त्याने पूर्वनियोजित कट म्हणून सोबत चाकू व पेट्रोल आणले होते. त्याच्यासोबत पत्नीला पाठवत नसल्याचे सासरच्यांनी सांगितल्यानंतर त्याने प्रथम पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकले. नंतर पत्नी, सासरा व मेव्हण्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. सासूवर वार करणार तोच जिवाच्या आकांताने सासू पळाल्याने तिचा जीव वाचला. बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांनी आरोपीला पकडले व बाळापूर पोलिसांच्या हवाली केले. 


त्याने ५ दिवसांपूर्वी केली पत्नीस मारहाण 
११ मे रोजी आरोपी सै.फिरोज सै. रज्जाक हा पत्नीला घेण्यासाठी बाळापूर येथे आला होता. तेव्हासुद्धा त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. त्यावेळीही त्याने पत्नीला मारहाण केली होती. पत्नीने त्याची तक्रार पोलिसांत दिली होती. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...